छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवणाटाकळी तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. (Nitesh Rane)
कमी पर्जन्यमानाचा परिणाम शिवणाटाकळी तलावातील पाणीसाठ्यावर झाला असून, तलावाची पाणीपातळी सध्या सुमारे 34% पर्यंत घसरली आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळे मत्स्य उत्पादनावरही परिणाम होत असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. (Nitesh Rane)
https://www.prahaar.in/2026/09/28/fishermen-will-not-get-help-like-farmers-during-drought/
दुष्काळी परिस्थितीत ‘दुष्काळ Trigger-1’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित तलाव, जलाशय आणि इतर ठिकाणी पंचनामे करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिवणाटाकळी तलावातील पाण्याची घटलेली पातळी आणि त्याचा मत्स्य व्यवसायावर झालेला परिणाम याचे आवश्यक मोजमाप करून पंचनामे करण्यात येणार आहेत. (Nitesh Rane)
पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पात्र मच्छीमारांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मच्छीमारांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.
दरम्यान, मच्छीमारांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले. (Nitesh Rane)
https://www.prahaar.in/2026/09/28/minister-nitesh-rane-to-visit-drought-hit-marathwada-today/
या भागातील महिला मच्छीमार बचत गटांना त्यांच्या मत्स्यजन्य उपपदार्थांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. उत्पादनासोबतच विक्रीसाठी बाजारपेठ मिळाल्यास महिला बचत गटांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते.
मंत्री नितेश राणे यांच्या पाहणीवेळी स्थानिक आमदार संजना जाधव, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सह आयुक्त ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी उपस्थित होते. (Nitesh Rane)