Home देश Chirag Paswan : “प्रियंका गांधी कशा जिंकल्या ? केरळ-हिमाचलमध्ये तुमचे सरकार कसे आले ?”; निवडणूक आयोगाच्या मुद्यावर चिराग पासवान यांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

Chirag Paswan : “प्रियंका गांधी कशा जिंकल्या ? केरळ-हिमाचलमध्ये तुमचे सरकार कसे आले ?”; निवडणूक आयोगाच्या मुद्यावर चिराग पासवान यांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

0
Chirag Paswan : “प्रियंका गांधी कशा जिंकल्या ? केरळ-हिमाचलमध्ये तुमचे सरकार कसे आले ?”; निवडणूक आयोगाच्या मुद्यावर चिराग पासवान यांचा काँग्रेसवर हल्लाबोल!
Chirag Paswan

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर पूर्ण समाधान व्यक्त केले आहे. सुरुवातीला या विषयावर मनात शंका होत्या, मात्र आयोगाने प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर खुलासा केल्यानंतर चिंता दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी विरोधी पक्षांवर दुटप्पी भूमिकेचा आरोप करत जोरदार निशाणा साधला. “केरळ आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार कसे स्थापन झाले ?” असा सवाल उपस्थित करत चिराग यांनी, स्वतःच्या सोयीनुसार निवडणूक आयोगावर टीका करणे योग्य नसल्याचे ठणकावून सांगितले.

आयोगाच्या खुलाशाने शंकांचे निरसन

https://www.prahaar.in/2026/09/28/sonam-maskars-impressive-performance-at-the-asian-games-india-wins-silver-medal-in-10m-air-rifle/

याआधी एका वृत्ताच्या आधारे निवडणूक प्रक्रिया (SIR आणि फॉर्म-६) बाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चिराग पासवान यांनीही पारदर्शकतेची मागणी केली होती. मात्र, आता त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, “जनतेच्या मनातील शंका आणि काळजी दूर करणे ही माझी प्राथमिकता होती. काल निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने प्रत्येक मुद्द्याचे टप्प्याटप्प्याने आणि सविस्तर उत्तर दिले आहे, त्यावरून माझे पूर्ण समाधान झाले आहे.”

विरोधी पक्षांच्या निवडक टीकेवर जोरदार आक्षेप

विरोधी पक्षांवर प्रहार करताना चिराग पासवान म्हणाले की, विरोधकांना केवळ भाजप किंवा एनडीएची सत्ता असलेली राज्येच दिसतात, परंतु जिथे त्यांचे स्वतःचे सरकार आहे ती राज्ये का दिसत नाहीत? “केरळ आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता कशी आली, याचा विचार विरोधक का करत नाहीत? एकीकडे निवडणूक प्रक्रियेला चुकीचे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच प्रक्रियेतून मिळालेला विजय स्वीकारायचा, ही सोयीस्कर टीका आता चालणार नाही,” असे ते म्हणाले.

“प्रियंका गांधींचा विजय कसा झाला ?” चिराग यांचा सवाल

विरोधाभासावर बोट ठेवताना चिराग यांनी थेट प्रियंका गांधी यांच्या विजयाचा उल्लेख केला. “जर या निवडणूक प्रणालीत एवढी मोठी त्रुटी किंवा अडचण होती, तर प्रियंका गांधी निवडणूक कशा जिंकू शकल्या? जिथे विरोधक स्वतः जिंकतात, तिथे ते मूग गिळून गप्प बसतात. जर सवाल उपस्थित करायचेच असतील तर ते सर्व ठिकाणांसाठी समान असले पाहिजेत,” असे चिराग यांनी ठामपणे मांडले.

उत्तर प्रदेशात पक्षाचा पाया मजबूत होत असल्याचा दावा

उत्तर प्रदेशातील आगामी राजकीय समीकरणांवर भाष्य करताना चिराग पासवान यांनी उत्साही प्रतिक्रिया दिली. “काल प्रयागराज येथे झालेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील तरुणांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. यामुळे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमच्या पक्षाला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. तरुणांचा हा पाठिंबा पाहता, आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असून आगामी काळात जनतेचा आशीर्वाद नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here