Home क्रीडा IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video

IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video

0
IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video
IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video (Photo: ANI)

जापानच्या आयची नगोया येथे एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना अफगाणिस्तानशी होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना झाला नाही आणि टीम इंडियाला पुढच्या फेरीचं तिकीट मिळालं. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना नेपाळ किंवा श्रीलंकेशी होईल. असं असताना जापानमध्ये असलेल्या भारतीय संघाचे डोळे हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेवर लागले होते. या वनडे सामन्यात भारताची स्थिती काय आहे? यासाठी चर्चा रंगली होती. पण जापानमध्ये क्रिकेट लोकप्रिय नसल्याने त्याचं प्रसारणही केलं जात नाही.27 सप्टेंबर 2026 रोजी झालेला भारत वेस्ट इंडिज सामना जापानमध्ये ब्रॉडकास्ट होत नव्हता. त्यामुळे इशान किशन आणि अभिषेक शर्मासमोर एक पेच निर्माण झाला होता. हा सामना कुठे पाहता येईल यासाठी शोधाशोध सुरू झाली. हा वनडे सामना पाहण्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी देशी जुगाड केला. यासाठी युट्यूब कामी आलं.

नेमका कसा पाहिला सामना?

अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी भारत वेस्ट इंडिज सामना पाहण्यासाठी युट्यूबवर मार्ग शोधला. त्यांनी युट्यूबवर जाऊन सामन्याचं लाईव्ह समालोचन ऐकलं आणि सामन्याचा आनंद लुटला. यावेळी त्या समालोचनावर प्ले होत असलेलं ग्राफिक्स पाहून त्यांनाही हसू आवरलं नाही. त्यांच्या दोघांतील चर्चाही या निमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संपूर्ण प्रकार इशान किशने आपल्या मोबाईल फोनमध्ये चित्रित केला आणि इन्स्टाग्राम स्टोरीत पोस्ट केला आहे. व्हिडीओत दोघेही प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंग एक्शनवर चर्चा करताना दिसले.

https://www.prahaar.in/2026/09/28/rohit-sharma-slipped-and-fell-while-getting-off-the-bus-after-the-match-against-the-west-indies-video-viral/

भारत वेस्ट इंडिज सामना

भारताने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं आणि 1-0 ने आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने 295 धावा केल्या आणि विजयासाठी 296 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने फक्त 2 गडी गमवून 41.4 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात रोहित शर्माने 32, शुभमन गिलने 110, विराट कोहलीने नाबाद 139 आणि ऋतुराज गायकवाडने नाबाद 13 धावांची खेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here