Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Price Today : काय सांगताय? इतकं स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेट सोन्याचा दर 2510 रुपयांनी कमी, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : काय सांगताय? इतकं स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेट सोन्याचा दर 2510 रुपयांनी कमी, जाणून घ्या आजचे दर

0
Gold Price Today :  काय सांगताय? इतकं स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेट सोन्याचा दर 2510 रुपयांनी कमी, जाणून घ्या आजचे दर
gold

सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवट्या काही दिवसांत सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना मोठी सुवर्ण संधी मिळाली आहे. तर चला जाणून घेऊ आज 28 सप्टेंबर 2026 रोजी सोने आणि चांदीचे दर किती आहे.

24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घट

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. 1 तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 2510 रुपयांनी कमी होऊन 1,50,170 रुपये झाला आहे. तर 10 तोळा सोन्याच्या दरात 25,100 रुपयांची घट झाली असून, त्यासाठी आता 15,01,700 रुपये मोजावे लागतील.

https://www.prahaar.in/2026/08/15/gold-silver-rate-today-jalgaons-gold-market-sees-a-surge-again/

22 कॅरेट सोन्याच्या दरातही घट

यासोबतच 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 1 तोळा दर 2300 रुपयांनी कमी होऊन 1,37,650 रुपये झाला आहे. तर 10 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 13,76,500 रुपये मोजावे लागतील. सोन्याचे दागिने प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्यापासून तयार केले जात असल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हा दर महत्त्वाचा आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरातही आज 1880 रुपयांची घट झाली आहे. 1 तोळा 18 कॅरेट सोन्याचा दर 1,12,630 रुपये झाला आहे. तर 10 तोळा सोन्याची किंमत 11,26,300 रुपये झाली आहे.

दरम्यान, सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. 1 ग्रॅम चांदीचा दर 5 रुपयांनी कमी होऊन 240 रुपये झाला आहे. तर 1 किलो चांदीचा दर 5000 रुपयांनी घसरून 2,40,000 रुपये झाला आहे. त्यामुळे आजच्या दरांचा आढावा घेऊनच सोनं-चांदी खरेदी करण्याचा निर्णय ग्राहक घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here