Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Ganeshotsav 2026 : मुंबईत यंदा तब्बल साडे नऊ हजारांहून बाप्पा झाले कमी

Mumbai Ganeshotsav 2026 : मुंबईत यंदा तब्बल साडे नऊ हजारांहून बाप्पा झाले कमी

0
Mumbai Ganeshotsav 2026 : मुंबईत यंदा तब्बल साडे नऊ हजारांहून बाप्पा झाले कमी

सार्वजनिक ५२ मंडळांचे गणपती वाढले, पण घरगुती गणपतींची संख्या घटली

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत गणरायांचे आगमन झाल्यांनतर मागील बारा दिवस बाप्पांची पुजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दर्शीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. घरोघरी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळांच्यावतीने प्रतिष्ठापना केलेल्या बहुतांशी गणेश मूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार पडले. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मूर्तीच्या संख्येत ५२ वाढ झाली असली तरी घरगुती गणेश मूतींची प्रतिष्ठापना मोठ्याप्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या एकूण सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींची संख्या पाहता तब्बल ९८३६ गणेशमूतींची संख्या कमी झालेली आहे. दरवर्षी किमान दहा हजार मूर्तींची संख्या वाढत असताना यंदा मात्र तब्बल दहा हजार गणेश मूर्तींची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यंदाच्या उत्सवात एकूण १ लाख ९९ हजार १८५ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले, तर मागील वर्षीच्या म्हणजे २०२५ च्या गणेशोत्सवामध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशाप्रकारे एकूण २ लाख ०९ हजार ०२१ एवढ्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. त्यामुळे मागील उत्सवाच्या तुलनेत यंदा घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती तसेच गौरींची संख्या ९८००ने कमी झाल्याचे दिसून येत आहे.

https://www.prahaar.in/2026/09/27/one-reel-ruined-everything-a-youtuber-couples-mistake-led-to-a-burglary-even-the-police-were-left-baffled/

मागील गणेशोत्सवात म्हणजे सन २०२५मध्ये १०,३६९ एवढ्या सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती होत्या,तर यंदा २०२६मध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन झालेल्या एकूण उत्सवातील गणेश मूर्तींची संख्या ही १०,४२१ एवढी आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात ५२ गणेश मंडळांच्या मूर्तींची संख्या वाढल्याचे पहायला मिळाले आहे. तर मागील वर्षीच्या उत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींमध्ये १३२ने घट झाल्याचे पहायला मिळत होते.

मागील वर्षी घरगुती गणेश मूर्तींची संख्या घरगुती गणपतींची संख्या १ लाख ९१ हजार ८९४एवढी होती, तर यंदा घरगुती गणेश मूर्तींची संख्या १ लाख ८२ हजार ०२९ एवढी दिसून आली आहे. त्यामुळे घरगुती गणेश मूर्तींमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ९८६५ गणेश मूर्तींची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या श्रीगणेशोत्सवातील एकूण विसर्जित श्रीगणेशमूर्ती

सार्वजनिक – १० हजार ४२१

घरगुती – १ लाख ८२ हजार ०२९

गौरी / हरतालिका – ६ हजार ७३५

एकूण – १ लाख ९९ हजार १८५

गणेशोत्सवातील दिवसनिहाय विसर्जन-

दीड दिवस – ६२ हजार ७६२

पाच दिवस – ३७ हजार ०६९

सहा दिवस – ४४ हजार २८६

सात दिवस – १८ हजार ८२८

अकरा दिवस – ३६ हजार २४०

एकूण – १ लाख ९९ हजार १८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here