Home ब्रेकिंग न्यूज Pune News: “वय केवळ आकडा…” पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

Pune News: “वय केवळ आकडा…” पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

0
Pune News: “वय केवळ आकडा…” पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video
फोटो सौजन्य: X Video

पुणे: नुकतंच आपण सर्वांनी गणरायाला जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या गणेश मिरवणुकींतील अनेक सीन्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच सध्या पुण्यातील आजींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आजींनी आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांचेच मन जिंकले आहे. आजींनी थेट ट्रॅक्टरच्या बोनटवर उभं राहून तरूणाईंच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. पुणे शहरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी होऊन सणाचा आनंद द्विगुणित करतात.

https://www.prahaar.in/2026/09/27/farmers-are-not-alone-devabhau-extends-support-to-farmers-here-is-what-mla-chitra-wagh-said/

पुण्यामध्ये दरवर्षी अनेक तरूण- तरूणी किंवा वयोवृद्ध व्यक्ती आपल्या हटक्या कलाकृतीने नागरिकांचे मन जिंकून घेतात. अशातच यावर्षी सुद्धा एका आजींना सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलं आहे. पुण्यातील एका सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टरवर उभं राहून डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. हिरव्या रंगाच्या काठा पदराची साडी नेसून आजींनी “आनंद पोटात माझ्या माईना…” या गाण्यावर मिश्किल पद्धतीने डान्स केला आहे. तरूणाईसोबत थिरकत आजींनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या आजींचा डान्सचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आजींच्या डान्सचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

 

नेमक्या कोणत्या गणेश मंडळाच्या मिरवणुकीतला हा व्हिडिओ याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही. परंतु आजींच्या डान्सने पुणेकरांचे लक्ष वेधले आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकींतील अनेक व्हिडिओज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यापैकीच हा देखील व्हिडिओ आहे. आजींसोबत अनेक तरूणाई सुद्धा ठेका धरताना दिसत आहे. सर्वच वयोगटातील भाविकांनी गणेश मिरवणुकीमध्ये ठेका धरला आहे. आजींनी मनमुराद डान्स करत आपला आनंद द्विगुणित केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स “वय केवळ आकडा…” अशी कमेंट करताना दिसत आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/27/matang-community-to-storm-mumbai-mega-rally-on-september-29-to-demand-sub-categorization/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here