Home ब्रेकिंग न्यूज Mumbai News : राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायू गळती, 2 तरुणांचा मृत्यू

Mumbai News : राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायू गळती, 2 तरुणांचा मृत्यू

0
Mumbai News : राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायू गळती, 2 तरुणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूसारखा वास पसरल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. (Suspected Chemical Leak)

शौचालयात रासायनिक वायू पसरला

मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर पूर्व परिसरातील मृणालताई पुलाजवळ, पारशी पंचायत गेटसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयातून रासायनिक वास येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. या वासामुळे दोन जणांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोघांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात ( Trauma Care Hospital) नेण्यात आले.

मात्र, रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी दोघांनाही पहाटे 3:49 वाजता दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. मृतांमध्ये प्रभाकर धनीवर (वय 24) आणि भाविन देसाई (वय 18) यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि बीएमसीच्या संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शौचालयात नेमका कोणता रासायनिक पदार्थ होता आणि त्यातून वायू किंवा तीव्र वास कसा निर्माण झाला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोघांना रासायनिक वासामुळे त्रास झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, संबंधित विभागांकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here