नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारताने 300 रनमध्ये 8 विकेटमध्ये सामना जिंकला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिलच्या जबरदस्त खेळीने भारताने पहिला वनडे सामना जिंकला आहे. भारतासमोर विजयासाठी वेस्ट इंडिजने 296 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरूवात केली. यांच्या खेळीने संपूर्ण क्रिकेट स्टेडिअमचं लक्ष वेधून घेतलं होतं. या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीने 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/27/anahat-and-abhay-singh-narrowly-miss-out-on-gold-india-secures-two-historic-silver-medals-in-squash/
वनडे क्रिकेट सामन्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या वनडे सामन्यात विराटने शतक पूर्ण केलं आहे. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामन्यात 18426 धावांची खेळी केली आहे. आता त्या नंतर विराट कोहलीचं नाव आलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. दरम्यान, शुबमन गिल 74 धावांवर, त्यानंतर रोहित शर्मा 32 धावांवर तर विराट कोहलीने आणि ऋतुराज गायकवाडने आपल्या जबरदस्त खेळीने मॅचची संपूर्ण खिंड लढवली आहे. दरम्यान, विराट कोहलीने 88 बॉलमध्ये 139 रन बनवले आहेत. तर त्याने मॅचमध्ये 10 चौकार आणि 9 षटकार मारले आहेत. तर, ऋतुराज गायकवाडने 19 चेंडूंमध्ये 13 धावा बनवल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/27/ind-vs-wi-1st-one-day-virat-kohli-has-crossed-the-15000-run-mark-in-odi-cricket/