Home ब्रेकिंग न्यूज Anjali Anand News: “वजन कमी कर, त्यानंतर…”, कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्रीला दिलेला सल्ला; म्हणाली, “अभिनय सोडण्याचा…”

Anjali Anand News: “वजन कमी कर, त्यानंतर…”, कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्रीला दिलेला सल्ला; म्हणाली, “अभिनय सोडण्याचा…”

0
Anjali Anand News: “वजन कमी कर, त्यानंतर…”, कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्रीला दिलेला सल्ला; म्हणाली, “अभिनय सोडण्याचा…”
फोटो सौजन्य: अंजली आनंद इन्स्टाग्राम

मुंबई: अभिनेत्री म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन स्लिम- ट्रीम असलेली अभिनेत्री नजरेसमोर येते. पण त्याला अपवाद अभिनेत्री अंजली आनंद आहे. अभिनय आणि डान्समधून प्रकाशझोतात आलेल्या अंजलीला इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. तिने बचत केलेले पैसे सुद्धा संपले होते, सोबतच तिने अभिनय सोडून परदेशामध्ये सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. ‘डब्बा कार्टेल’, ‘रात जवानी है’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून अंजली चाहत्यांच्या भेटीला आली आहे. नुकतंच बॉलिवूड दिग्दर्शिका फराह खान हिने अंजलीच्या मुंबईतील घरी भेट दिली. यावेळी अंजलीने फराहला तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले.

https://www.prahaar.in/2026/09/27/rocking-star-yashs-regal-look-as-ravana-in-the-movie-ramayana-has-been-revealed-audience-excitement-has-reached-a-fever-pitch/

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहरच्या एका चित्रपटामध्ये अंजली आनंदला काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटानंतर अंजलीसाठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे अनेक संधी तिला उपलब्ध झाली. त्याचदरम्यान तिला ‘धमाल 4’ हा सुपरहिट चित्रपट सुद्धा मिळाला. या सुपरहिट चित्रपटामध्ये अंजलीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. फराह खानच्या ब्लॉगमध्ये अंजलीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले होते. अंजली ब्लॉगमध्ये म्हणाली की, “2020 हे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. मी देश सोडून आणि अभिनय क्षेत्र सोडून जाण्याच्या विचारात होते. मला कुठूनही चित्रपटाच्या ऑफर येत नव्हत्या. वैश्विक महामारी होती. माझी सर्व सेव्हिंग्स सुद्धा संपायला आली होती. मी 6 महिने एकटीच भाड्याच्या घरात राहत होते.”

“मला आठवतंय, माझ्या मैत्रिणी मला गोव्याला घेऊन गेल्या होत्या. त्याच दिवशी मला कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचा मेसेज आला होता. ‘बेबी… मला फोन कर’, असा त्यांनी मला मेसेज सेंड केला होता.” त्यानंतर पुढे अंजली म्हणाली की, “मी अनेकदा शानूला भेटलेय. मी केव्हाही तिला भेटते तेव्हा ती मला एकच वाक्य म्हणायची, ‘तू वजन कमी कर, त्यानंतर आपण काहीतरी करूया’. खरंतर मला सतत रिजेक्शन मिळत असल्यामुळे मी जवळपास फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं स्वप्नच सोडून दिलं होतं.” अंजलीच्या आईने सुद्धा सांगितले की, जेव्हा अंजली ऑडिशनसाठी घरातून जायची, त्यावेळी तिला अनेकदा वाटायचे की कदाचित यावेळी तिची निवड होणार नाही. ती मनातल्या मनातच म्हणायची, “यावेळी सुद्धा अंजलीची निवड होणार नाही.”

https://www.prahaar.in/2026/09/27/you-can-now-watch-emraan-hashmis-superhit-movie-from-the-comfort-of-your-home-ott-release-date-for-awarapan-2-announced/

“दिग्दर्शक आणि निर्माते करण जौहर यांना भेटायला जाणार असल्याचं मी माझ्या आईला सांगितलं होतं. तर तिच्या सुद्धा मनामध्ये शंका होती. ती म्हणाली, ‘तू खरंच करण जोहरला भेटायला चाललीये? तो तुला भेटायला बोलवेल?’ तेव्हा मी आईला म्हणाले की, ‘अगं हो खरंच, मी खरंच करण जोहरला भेटायला चालले आहे.’ करणला माझा प्रोफाईल आणि माझी ऑडिशन खूप आवडली होती. त्यानंतर मला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट मिळाला.”, असं तिने फराहच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. अंजलीच्या आईने नंतर स्पष्ट केले की, तिची ती टिप्पणी काळजीपोटी होती, कारण इंडस्ट्रीमध्ये अंजलीला कोणाचाही पाठिंबा किंवा गॉडफादर नव्हता. आज जरीही अंजलीचा इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नसला तरीही तिने आपल्या कतृत्वाच्या जोरावर स्वत:चे स्थान प्रस्थापित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here