Home देश 30 दिवसांचे प्लॅन्स अन् व्हॉईस-एसएमएसचे पर्याय दाखल; खासदार राघव चड्ढांची प्रीपेड युजर्ससाठी मोठी घोषणा! काय बदल झाले आहेत ते जाणून घ्या

30 दिवसांचे प्लॅन्स अन् व्हॉईस-एसएमएसचे पर्याय दाखल; खासदार राघव चड्ढांची प्रीपेड युजर्ससाठी मोठी घोषणा! काय बदल झाले आहेत ते जाणून घ्या

0
30 दिवसांचे प्लॅन्स अन् व्हॉईस-एसएमएसचे पर्याय दाखल; खासदार राघव चड्ढांची प्रीपेड युजर्ससाठी मोठी घोषणा! काय बदल झाले आहेत ते जाणून घ्या
Raghav Chadha Says Prepaid Users Will Get 30-Day Recharge Plans ( source: Raghav Chadha twit X)

नवी दिल्ली : देशातील करोडो मोबाईल प्रीपेड युजर्ससाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी नवीन प्रीपेड मोबाईल रिचार्ज पर्यायांचे स्वागत करत या बदलांमुळे ग्राहकांना अधिक लवचिकता व आर्थिक सवलत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नवीन नियमांनुसार आता 30 -दिवसांच्या रिचार्ज योजना आणि केवळ व्हॉइस व एसएमएसचे पर्याय उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे ग्राहकांची दरमहा होणारी कटकट कमी होणार आहे.(mobile recharge new rules 2026)

https://www.prahaar.in/2026/09/27/wi-vs-ind-trivandrum-odi-campbell-greaves-opening-partnership-record/

नवीन नियमांमुळे काय बदल झाले आहेत?

दूरसंचार क्षेत्रात मोठे बदल घडवून आणत सरकारने ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) विनियम, 2026’ लागू केले आहेत. या नवीन नियमांमुळे प्रीपेड वापरकर्त्यांना खालीलप्रमाणे प्रमुख फायदे मिळणार आहेत:

  • 30-दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स: आतापर्यंत 28 दिवसांचे प्लॅन्स असल्यामुळे वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावा लागत असे. मात्र, नवीन 30-दिवसांच्या प्लॅन्समुळे वर्षाला फक्त 12 वेळा रिचार्ज करण्याची गरज उरेल.
  • फक्त व्हॉइस आणि एसएमएसचे प्लॅन्स: ज्या ग्राहकांना इंटरनेट किंवा डेटाची अजिबात आवश्यकता नाही, अशा युजर्ससाठी आता स्वतंत्रपणे केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसचे किफायतशीर प्लॅन्स उपलब्ध झाले आहेत.
  • कमी बजेटमधील योग्य पर्याय: ज्यांना केवळ साध्या व्हॉईस कॉल्सची गरज असते, त्यांच्यासाठी अधिक परवडणारे आणि लवचिक पर्याय खुले झाले आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/27/major-government-decision-for-drought-hit-maharashtra-relief-for-265-talukas-assessment-of-remaining-talukas-also-underway/

संसदेत उठवला होता आवाज

या नव्या बदलांवर प्रतिक्रिया देताना खासदार राघव चड्ढा यांनी ‘एक्स’ (X) वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “तुमच्यापैकी अनेकांनी मर्यादित आणि अलवचिक रिचार्ज पर्यायांबद्दल माझ्याकडे चिंता व्यक्त केली होती. ग्राहकांसाठी अधिक पर्याय आणि परवडणाऱ्या योजना मिळाव्यात, या मागणीसाठी मी 11 मार्च रोजी संसदेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता.”

28 दिवसांच्या चक्रामुळे ग्राहकांना एका वर्षात 13 वेळा पैसे मोजावे लागत होते, यावर चड्ढा यांनी वारंवार आक्षेप घेतला होता. आता या नव्या सुधारणांमुळे युजर्सना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून रिचार्ज निवडण्याचे अनेक स्वातंत्र्य मिळाले आहे.(mobile recharge new rules 2026)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here