Home क्रीडा Asian Games 2026 : इराणला धूळ चारत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

Asian Games 2026 : इराणला धूळ चारत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

0
Asian Games 2026 : इराणला धूळ चारत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक
India vs Iran kabaddi

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतासाठी एक अतिशय अभिमानास्पद आणि सुवर्णमय बातमी समोर आली आहे. भारताच्या महिला कबड्डी संघाने अंतिम आणि अत्यंत अटीतटीच्या सामन्यात इराणचा ३७-३३ असा पराभव करत सुवर्णपदकावर आपले सोनेरी अक्षरांनी नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कबड्डीमध्ये भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले असून, भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.(Indian women kabaddi team)

अटीतटीचा अंतिम सामना आणि रोमहर्षक विजय

नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. इराणच्या खेळाडूंनी भारतीय संघाला सुरुवातीपासूनच कडवी टक्कर दिली. मात्र, भारतीय महिला खेळाडूंनी दाखवलेले उत्कृष्ट कौशल्य, चपळता आणि मानसिक संयम यामुळे सामन्याच्या शेवटी भारताने 37-33 अशा फरकाने विजय आपल्या नावावर केला. विजयाची घोषणा होताच संपूर्ण क्रीडा विश्वातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://www.prahaar.in/2026/09/26/minister-nitesh-rane-on-a-tour-of-chhatrapati-sambhajinagar-and-jalna-to-review-issues-concerning-farmers/

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कबड्डीचा सुवर्ण इतिहास

भारतीय महिला कबड्डी संघाचा हा सुवर्णप्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2010, 2014 आणि 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदके जिंकली होती. या महामुकाबल्यापूर्वी, हांगझू गेम्सच्या रोमांचक अंतिम सामन्यात चायनीज तैपेईचा 26-25 असा रोमहर्षक पराभव करून भारतीय संघाने या वेळेसही अंतिम फेरीत धडक मारली होती. आता इराणविरुद्धचा हा विजय भारतीय महिला कबड्डीच्या सुवर्ण इतिहासात आणखी एक नवा अध्याय जोडणारा ठरला आहे.(Indian women kabaddi team)

तिरंग्याचा मान उंचावला

या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. महिला खेळाडूंनी मिळवलेले हे यश केवळ एक पदक नसून, भारतीय महिलांच्या खेळातील उच्च दर्जा आणि जिद्दीचे प्रतीक आहे. भारताच्या या लेकींनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा तिरंगा झेंडा फडकवून देशाचे नाव जगभरात उंचावले आहे. क्रीडाप्रेमी आणि दिग्गजांकडून या सुवर्णविजेत्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.(Indian women kabaddi team)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here