Home महाराष्ट्र नाशिक Nashik : वडिलांना पोहतांना पाहिल्यानंतर मुलगा ही पाण्यात उतरला अन् अनर्थ घडला ! बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचाही मृत्यु , १४ वर्षीय मुलगा बेपत्ता

Nashik : वडिलांना पोहतांना पाहिल्यानंतर मुलगा ही पाण्यात उतरला अन् अनर्थ घडला ! बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचाही मृत्यु , १४ वर्षीय मुलगा बेपत्ता

0
Nashik : वडिलांना पोहतांना पाहिल्यानंतर मुलगा ही पाण्यात उतरला अन् अनर्थ घडला ! बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचाही मृत्यु , १४ वर्षीय मुलगा बेपत्ता

Nashik : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये खळबळजनक घटना घडली, गुरुवारी पाण्यात पोहत असलेल्या वडिलांना पाहून पाण्यात उतरलेल्या १४ वर्षीय मुलाचा डोहातील पाण्याच्या प्रवाहात बुडण्याचा प्रकार लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाला. मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून, त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त आहे.

गुरुवारी (दि.२४) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पहिने बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगत असलेल्या डोहात ही दुर्दैवी घटना घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय धोंडू सोनवणे (वय ४८, रा.अक्षय चौक, नवीन नाशिक ) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/25/9641-ganesh-idols-collected-in-nashik-by-the-afternoon-following-immersion-high-proportion-of-pop-idols/

नेमकं काय घडलं ?

संजय सोनवणे हे डोहातील पाण्यात पोहत होते. त्यांना पाहून त्यांच्या मुलालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे दुरवरुन लक्षात येताच संजय सोनवणे यांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

मुलगा अद्यापही बेपत्ता

पोलिसांसह बचाव पथकाने शोधमोहीम राबवत रात्री साडेसातच्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here