Home गणेशोत्सव Ganesh Visarjan 2026: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

Ganesh Visarjan 2026: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

0
Ganesh Visarjan 2026: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

बाप्पाला निरोप देण्यासाठी गुलालाची उधळण, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने विसर्जन घाटांवर भक्तीचा पूर लोटला आहे. गणेश भक्तांच्या डोळ्यांत आसवे आणि ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या’ हाच मंत्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाला असून त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्यावर अलोट गर्दी केली आहे. मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि परळच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने वाजत-गाजत निघाली आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून चोख व्यवस्था आणि पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/25/mukesh-and-nita-ambani-participate-in-the-lalbaugcha-raja-aarti-with-their-grandchildren-watch-the-video/

पुणे नाशिकमध्ये मानाच्या गणपती विसर्जनाचा सोहळा

पुण्यातही मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत. नाशिकच्या गोदाकाठी, नागपूरच्या फुटाळा तलावावर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे.

रायगडमध्येही बाप्पाच्या विसर्जनाची तयारी

रायगड जिल्ह्यात तब्बल 13,597 गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यामध्ये 13,439 घरगुती आणि 158 सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचा समावेश आहे. ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यातील नद्या, तलाव आणि समुद्र अशा 500 हून अधिक विसर्जन स्थळांवर बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जात असून, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व घाटांवर चोख पोलीस बंदोबस्त आणि जीवरक्षक तैनात केले आहेत.

पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार?

यंदाच्या तुलनेत पुढील वर्षी लाडक्या बाप्पाचे आगमन तब्बल 10 दिवस आधी होणार आहे. म्हणजेच गणपती बाप्पाच्या भाविकांना 10 दिवस कमी वाट पाहावी लागणार आहे. यंदा बाप्पाचं आगमन 14 सप्टेंबर 2026 रोजी झालं होतं. पण पुढच्या वर्षी 4 सप्टेंबर 2027 रोजी गणेश चतुर्थी असून तेव्हा गणपती बाप्पा विराजमान होतील. 7 सप्टेंबर गौरी आवाहन असेल, तर 8 सप्टेंबरला गौरी पूजन असेल. 9 सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन आणि 14 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here