Home देश Samastipur Crime News : पुन्हा एकदा ‘जमुई कांड’! अल्पवयीन मुलीचा भरदिवसा छळ, व्हिडिओ व्हायरल होताच 4 आरोपी अटकेत

Samastipur Crime News : पुन्हा एकदा ‘जमुई कांड’! अल्पवयीन मुलीचा भरदिवसा छळ, व्हिडिओ व्हायरल होताच 4 आरोपी अटकेत

0
Samastipur Crime News : पुन्हा एकदा ‘जमुई कांड’! अल्पवयीन मुलीचा भरदिवसा छळ, व्हिडिओ व्हायरल होताच 4 आरोपी अटकेत

बिहार : बिहारमधील जमुई कांड ताजं असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. भरदिवसा एका अल्पवयीन मुलीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. ही घटना 15 सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bihar Crime News)

समोर आलेल्या माहितीनुसार, समस्तीपूरमधील कर्पुरीग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतसिंगपूर गावाजवळील धरण परिसरात हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून धरण परिसरात गेले होते. दोघेही तेथे बोलत असताना काही तरुणांनी त्यांना घेरले. यावेळी तरुणांनी मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलगा तेथून निघून गेला. (Samastipur News)

https://www.prahaar.in/2026/09/24/wait-for-the-metro-continues-for-pune-residents-inauguration-of-the-hinjawadi-shivajinagar-metro-postponed-again/

घटनेचे व्हिडिओ व्हायरल

मुलगा गेल्यानंतर संबंधित तरुणांनी मुलीला त्रास देण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगी या प्रकाराला विरोध करत असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. आरोपींनी तिच्याकडे पत्ता विचारल्याचा आणि तिच्यासोबत असलेल्या मुलाबाबत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. मुलीने तो आपला भाऊ असल्याचे सांगितल्यानंतरही आरोपींनी तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच तपास सुरू करण्यात आला.

चौघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात राहुल कुमार (वय 19), अवधेश पासवान (वय 46), विकास शर्मा (वय 32) आणि रामबाबू साहनी (वय 38) या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे. ( Police Action)

समस्तीपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी व्हिडिओ समोर आल्यानंतर तातडीने तपास सुरू केल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here