मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज जारी केला असून मुंबई शहर आणि उपनगरांसह राज्यातील 21 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. (Rain Alert)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनने परतीची वाट धरली असली तरी अनेक भागांत पावसाची शक्यता कायम आहे. पूर्व घाटात वादळी पावसाचे वातावरण निर्माण झाले असून माथेरान-लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain Alert)
मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई परिसरातही संध्याकाळपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/09/24/switching-banks-without-ditching-your-old-fastag-has-become-easy-federal-bank-launches-revolutionary-onetag-facility/
राज्यातील 21 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी राज्यातील 21 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. (Rain Alert)
त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Alert)