Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Accident : कुलाब्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

Mumbai Accident : कुलाब्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

0
Mumbai Accident : कुलाब्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 23 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अफगाण चर्चजवळ, कोलाबा पोस्ट ऑफिसच्या बाजूला घडली. (Mumbai Road Accident)

ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या अपघाताची माहिती दिली. दोन दुचाकींची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांवरील व्यक्ती जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/09/23/record-set-by-bjps-diabetes-free-mumbai-campaign/

मात्र, रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोन्ही व्यक्तींना मृत घोषित केले. दोन्ही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची नावे आणि वयाची माहिती मिळणे बाकी आहे.

या घटनेची माहिती सकाळी 6 वाजता पोलिसांना मिळाली असून सकाळी 11.15 वाजता या प्रकरणाबाबत अपडेट देण्यात आले. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. (Road Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here