भारतीय पुरूष संघ एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी जापान दौऱ्यावर आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने जापान विरुद्ध मैत्रिपूर्ण सामना खेळला. हा सामना भारताने अवघ्या 2 धावांनी जिंकला. पण जापान संघाने भारतीय संघाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. त्यामुळे जापान संघाचं क्रीडाविश्वात कौतुक होत आहे. आता एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. दुसरीकडे, जापान दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ तिथल्या संस्कृतीबाबत जाणून घेण्यास प्रचंड उत्सुक आहे. त्यामुळे या दौऱ्यात जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा भारतीय संघाचे खेळाडू जापान फिरण्याचा आनंद लुटत आहे. या दरम्यान जसप्रीत बुमराह जापानमध्ये शॉपिंगसाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत संघ सहकारी अक्षर पटेलही होता. यावेळी जसप्रीत बुमराहने उशी खरेदी केली. पण तत्पूर्वी त्याच्या झोपण्याची पद्धत आणि पोश्चरची चांगल्या प्रकारे तपासणी केली गेली. हा सर्व प्रकार पाहून जसप्रीत बुमराहला आश्चर्याचा धक्का बसला.
जसप्रीत बुमराहच्या उशीत काय आहे खास?
स्पेशल उशी खरेदी करण्यापूर्वी जसप्रीत बुमराहची तपासणी कशी केली गेली, याचा पूर्ण व्हिडीओ अक्षर पटेलने चित्रित केला आहे. जसप्रीत बुमराहने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जापानमध्ये एखादी वस्तू विकताना त्याची किती काळजी घेतली जाते. त्यामुळे ती वस्तू खास असणारच, ही भावना पहिल्यांदा मनात येते. आता जसप्रीत बुमराहने खरेदी केलेल्या उशीत काय खासियत आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तर ही उशी जसप्रीत बुमराहची मानेचं पोश्चर आणि त्याचं मोजमाप करून तयार केली आहे. दुसरं म्हणजे, या उशीवर झोपल्याने जसप्रीत बुमराहला लोअर बॅक पेन आणि दुखापतीची शक्यताही कमी असेल.
View this post on Instagram
https://www.prahaar.in/2026/09/23/what-will-happen-to-gill-team-if-ajit-agarkar-leaves-the-selection-committee-a-new-dilemma-arises-ahead-of-the-2027-odi-world-cup/
उशीवरून संजना गणेशनने केली मजेशीर पोस्ट
जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओवर पत्नी संजना गणेशन हीने मजेशीर पोस्ट केली आहे. तिने लिहिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संजनाने सुरुवातीला विचारले, “यासाठीच का तुम्ही जापानला गेला होतात?” त्यावर जसप्रीत बुमराहने उत्तर दिले की, “तू मागितल्यावर मी तुला उशी देणार नाही.”