Home ब्रेकिंग न्यूज BMC Ganesh Gaurav Award : अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ पुन्हा एकदा अव्वल

BMC Ganesh Gaurav Award : अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ पुन्हा एकदा अव्वल

0
BMC Ganesh Gaurav Award : अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ पुन्हा एकदा अव्वल
Andheriteel Swapnakshay Mitra Mandal once again tops

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६’मध्ये अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला आहे. तर, घाटकोपर (पश्चिम) येथील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ भटवाडीचा राजा मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) मोहोर उमटवली आहे.(BMC Ganesh Gaurav Award)

https://www.prahaar.in/2026/09/23/will-ai-surpass-humans-by-2028-elon-musks-bold-prediction/

यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास, तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक श्री. मयेकर यांना विलेपार्ले येथील बाळ गोपाळ मित्र मंडळ मुंबईचा पेशवाच्या श्रीगणेश मूर्तीसाठी, तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे (सजावटकाराचे) पारितोषिक बोरिवली पूर्व येथील विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ (चंपाभुवनचा विघ्नहर्ता) सजावटीसाठी रेश्मा शिंदे यांना जाहीर करण्यात आले आहे. अवयवदान जागृतीसाठी विक्रोळी पश्चिम येथील बालमित्र कला मंडळाला, तर पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी कोकणीपाडा, दहिसर पूर्व येथील श्री. श्रद्धा मित्र मंडळ आणि दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. गोरेगाव (पश्चिम) येथील बेस्ट नगर गणेशात्सव मंडळ आणि मालवणी मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळ मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित झाली आहेत. याव्यतिरिक्त १४ मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत.

महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, यांनी या स्पर्धेच्या निकालाची घोषणा केली. महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्याच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.(BMC Ganesh Gaurav Award)

https://www.prahaar.in/2026/09/23/will-the-august-installment-of-the-ladki-bahin-yojana-be-credited-to-accounts-soon-funds-likely-to-be-received-after-september-24/

श्रीगणेशोत्सव सोहळा मुंबई महानगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या माध्यमातून नागरी सेवा-सुविधा तसेच जनहितविषयक संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे ३७ वे वर्ष असून या स्पर्धेत ५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरींमध्ये ही स्पर्धा पार पडली. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय, पर्यावरणपूरक मूर्ती, विषयाची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये, परिसर स्वच्छता, मुंबई महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये–कार्यांमध्ये नोंदविलेला सहभाग, पर्यावरणपूरकता, जनहित संदेशांचा वापर आदी बाबींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला.(BMC Ganesh Gaurav Award)

या स्पर्धेचे परिक्षण प्राची संसारे (जे. के. अकादमी, वडाळा), प्रशांत इप्ते (सर जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स), शिबानी जोशी (अखिल सार्वजनिक गणेशोत्स व महासंघ), प्रसाद मोहिते (बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ), दीपक कार्डिले (बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सह समन्वय समिती, परेश कारेकर (बृहन्मुंबई वक्रतुंड मूर्तिकार संघ), रवींद्र काळे (बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्त अधिकारी), मारुती मोरे (बृहन्मुंबई वार्ताहर संघ), दीपक चौधरी (संगीत व कला अकादमी बृहन्मुंबई महानगरपालिका) यांनी केले. या ९ परिक्षकांनी १७ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी प्राथमिक फेरी आणि १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी अंतीम फेरी पार पडली. त्यानंतर परिक्षकांकडून अंतीम निकाल लिफाफ्यात बंद करण्यात आला होता.(BMC Ganesh Gaurav Award)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here