Home ब्रेकिंग न्यूज Devghar On Rent Movie : ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटातील ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज; गौतमी पाटीलचा ठसकेबाज अंदाज!

Devghar On Rent Movie : ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटातील ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज; गौतमी पाटीलचा ठसकेबाज अंदाज!

0
Devghar On Rent Movie : ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटातील ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज; गौतमी पाटीलचा ठसकेबाज अंदाज!

मुंबई : अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शनचा संगम असलेला ‘देवघर ऑन रेंट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील ‘अगं आई गं…’ हे जल्लोषपूर्ण गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, त्याला अल्पावधीतच प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे. (Devghar On Rent Movie)

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी गाण्याला रंगत

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शन स्वरूप सावंत यांचे असून, संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची आहे. कथा-पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. (Devghar On Rent Movie)

https://www.prahaar.in/2026/09/22/a-tender-story-of-family-relationships-and-a-new-phase-of-life-the-first-poster-of-the-movie-sohala-has-grabbed-attention/

‘अगं आई गं…’ हे गाणे अस्सल मराठमोळा ठेका आणि आधुनिक संगीत यांचा मेळ साधणारे नृत्यगीत आहे. गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदा, मनमोहक हावभाव आणि सहकलाकारांच्या उत्साहामुळे गाण्याला रंगत आली आहे. गीतलेखन संजय नवगिरे, संगीत कबीर शाक्य आणि गायन मुग्धा कऱ्हाडे यांचे आहे.

चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्या भूमिका आहेत. ‘केजीएफ’फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे. कोरिओग्राफी किशोर दळवी, सिनेमॅटोग्राफी चैतन्य साळुंके आणि पार्श्वसंगीत रोहित नागभीडे यांचे आहे. ॲक्शन सीक्वेन्स राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी हाताळले आहेत. (Devghar On Rent Movie)

prahaar.in/2026/09/23/govinda-and-komal-rani-together-at-lalbaugcha-rajas-court-speculation-regarding-disputes-in-their-personal-lives-reignites/

कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके, निर्मिती व्यवस्थापक यश सणस, कला दिग्दर्शक दिलीप कंधारे, वेशभूषाकार अपेक्षा गांधी सोनी आणि रंगभूषाकार सुजीत सुरवसे आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टीमने प्रकाशयोजना, तर विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. (Devghar On Rent Movie)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here