Home देश RIMS Hospital : धक्कादायक! रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या वॉर्डला लागली आग; 3 चिमुकल्यांचा मृत्यू, 20 हून अधिक बालकांना हलवलं

RIMS Hospital : धक्कादायक! रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या वॉर्डला लागली आग; 3 चिमुकल्यांचा मृत्यू, 20 हून अधिक बालकांना हलवलं

0
RIMS Hospital : धक्कादायक! रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या वॉर्डला लागली आग; 3 चिमुकल्यांचा मृत्यू, 20 हून अधिक बालकांना हलवलं

तेलंगणा : तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयात सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. रुग्णालयातील नवजात बालकांच्या विशेष उपचार कक्षाला (SNCU) अचानक आग लागल्याने 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अवघ्या 5 दिवसांच्या नवजात बाळाचाही समावेश आहे. या घटनेनंतर रुग्णालयात मोठी खळबळ उडाली. (Telangana News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 11:40 वाजता SNCU वॉर्डमधील एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर वॉर्डमध्ये अचानक धूर पसरला आणि काही वेळातच आगीने गंभीर स्वरूप धारण केले. त्यावेळी वॉर्डमध्ये 24 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. (RIMS Hospital)

https://www.prahaar.in/2026/09/22/youth-dies-while-in-rpf-custody-at-csmt-relatives-allege-assault-cid-probe-underway/

धूर पसरल्याचे लक्षात येताच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय पथक रुग्णालयात दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि ती इतर भागात पसरण्यापासून रोखली. (Fire News)

बाळाचा गुदमरून मृत्यू

मात्र, या दुर्घटनेत 26 आठवड्यांच्या एका प्री-मॅच्युअर बाळासह 5 दिवसांच्या नवजात बाळाचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आगीमुळे आणि धुरामुळे त्रास झालेल्या 20 हून अधिक बालकांना तातडीने इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. त्यापैकी एका बाळाचा निझामाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृत बालकांची संख्या 3 झाली आहे.

इतर बालकांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदिलाबादचे जिल्हाधिकारी राजर्षी शाह आणि पोलीस अधीक्षक अखिल महाजन यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

दरम्यान, आगीचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. एसीमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली का, तसेच या घटनेत कोणतीही प्रशासकीय किंवा तांत्रिक निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ( New Born Baby Death News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here