पुणे : पुण्यातील लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 5 हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात हत्येच्या कटाबाबत तसेच आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न झाल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. ( Ketan Aggarwal Murder)
https://www.prahaar.in/2026/09/21/allu-arjun-atlee-raaka-sets-guinness-world-record-for-using-motion-capture-with-37-performers-simultaneously/
18 जून रोजी लोहगड परिसरात केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला तो दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा निष्कर्ष समोर आला. या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोषारोपपत्रातील पुराव्यांच्या आधारे पुढील सुनावणी होणार आहे.