Home देश GK: पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात जावे लागते का? वाचा काय आहेत नियम!

GK: पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात जावे लागते का? वाचा काय आहेत नियम!

0
GK: पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात जावे लागते का? वाचा काय आहेत नियम!
GK: पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात जावे लागते का? वाचा काय आहेत नियम! (Photo: Regional Passport Office, Mumbai Twitter)

विदेशवारी करायचं म्हंटलं तर पासपोर्ट हवाच. त्याशिवाय विदेशवारी करूच शकत नाही. पण पासपोर्ट काढताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वात प्रथम म्हणजे पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं जवळ असणं गरजेचं आहे. कागदपत्रं जवळ असली की सबमिशनचं काम झटपट होतं. पण त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा महत्त्वाचा टप्पा असतो. व्हेरिफिकेशनसाठी पोलीस तुमच्या घरी येऊ शकतात किंवा तुम्हाला पोलीस ठाण्यात जावं लागू शकतं. पासपोर्ट व्हेरिफेकशनसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक पोलीस व्यवस्थेनुसार, ही व्यवस्था वेगवेगळी असू शकते. पासपोर्ट गाइडलाईननुसार, नव्या पासपोर्टसाठी बहुतांश प्रकरणात प्री पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं. तर पासपोर्ट री-इश्यू प्रकरणात तशी काही गरज नसते किंवा पासपोर्ट जारी केल्यानंतर पोस्ट व्हेरिफिकेशन होतं.

पोलीस व्हेरिफेशनमध्ये नेमका काय तपास केला जातो?

पोलीस व्हेरिफिकेशनचा मुख्य हेतू हा अर्जदाराचा सध्याचा पत्ता, मागचा पत्ता आणि इतर गोष्टींचा तपास करण्याचा असतो. पासपोर्ट अर्जात मागच्या एका वर्षाचा निवासी पत्ता देणं बंधनकारक असतं. पोलीस संबंधित पत्ता आणि अर्जाची तपासणी करतात. यावेळी अर्जदाराला अर्ज करते वेळी सादर केलेली कागदपत्राची कॉपी किंवा गरज पडल्यास ओरिजनल डॉक्युमेंट्स दाखवावे लागतात.

https://www.prahaar.in/2026/09/22/the-indian-womens-team-won-the-gold-medal-by-defeating-sri-lanka-at-the-2026-asian-games/

…तर पोलीस ठाण्यात बोलवलं जाऊ शकतं

पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पोलीस घरीच येतील असं नाही. काही वेळा पोलीस तुम्हाला फोन करून घरी बोलवू शकतात. अशा स्थितीत तु्म्हाला योग्य ती कागदपत्रं घेऊन पोलीस ठाण्यात जावं लागेल. पोलीस व्हेरिफिकेशन स्थानिक पोलिसांच्या पद्धतीवर किंवा त्याच्या गरजेनुसार होते. जर पोलिसांनी तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं तर सोबत अर्ज करताना सादर केलेली सर्व कागदपत्र घेऊन जावं. यात तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता व्यवस्थित असावा. चुकीची किंवा अर्धवट माहिती असेल तर पोलीस व्हेरिफिकेशनध्ये अडचणी येऊ शकतात.

प्रत्येक पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन गरजेचं आहे का?

पासपोर्ट सेवा गाइडलाइननुसार, नव्याने पासपोर्ट काढणाऱ्या बहुतांश सर्व प्रकरणात प्री पोलीस व्हेरिफिकेशन होतं. काही प्रकरणात पोलीस व्हेरिफिकेशनची गरज नसते. पण पासपोर्ट री-इश्यू केला तर काही प्रकरणात पोस्ट पोलीस व्हेरिफिकेशन होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here