मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला मातृशोक झाला आहे. अभिनेत्रीची आई कृष्णा मुखर्जी यांचं निधन झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. आज (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त यशराज फिल्म्सकडून शेअर करण्यात आले असून मुखर्जी फॅमिलीच्या गोपनीयतेचा आदर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, अभिनेत्रीच्या अनेक फॅन पेजकडूनही कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाची माहिती शेअर करण्यात आली आहे. राणी मुखर्जीच्या आईच्या निधनाचे वृत्त ऐकून अभिनेत्रीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/22/yami-gautam-graces-72nd-national-film-awards-in-traditional-black-saree-twins-with-husband-and-article-370-producer-aditya-dhar/
नेमकं कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राणी मुखर्जीच्या सोशल मीडियावरील फॅनपेजवर अनेक चाहत्यांकडून आदरांजली वाहिली जात आहे. या दु:खद प्रसंगी मुखर्जी कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर राखण्याची विनंती करण्यात आली आहे. कुटुंबीयांकडून समोर आलेल्या निवेदनामध्ये लिहिले की, “आम्हाला हे वृत्त सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या मातोश्री कृष्णा मुखर्जी यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आज दुपारी (22 सप्टेंबर, मंगळवार) अखेरचा श्वास घेतला. या कठिण काळामध्ये तुमच्याकडून कुटुंबीयांना मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आहोत.”
“या कठीण काळामध्ये मुखर्जी कुटुंबीयांकडून प्रायव्हसी राखण्याची विनंती केली आहे. कठीण प्रसंगी मिळालेल्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल कुटुंबीय मनापासून आभारी आहेत. या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी कृपया आमच्या खासगीपणाचा आदर करावा,” असंही निवेदनात म्हटलं आहे. कृष्णा मुखर्जी यांच्या विषयी सांगायचे तर, त्या सुद्धा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत होत्या. त्यांनी जरीही कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलं नसलं तरीही त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांच्या गाण्यांमध्ये पार्श्वगायिकेचं काम केलं आहे. बंगाली सिनेसृष्टीशिवाय, इतर कोणत्याही इंडस्ट्रीसाठी त्यांनी काम केले नाही. 2017 साली राणीच्या वडिलांचं निधन झालं होतं, आता त्यानंतर 9 वर्षांनी तिच्या आईचं निधन झालं आहे.
https://www.prahaar.in/2026/09/22/atul-parchure-to-return-through-memories-teaser-for-the-movie-magazine-released/
दरम्यान, राणीचं तिच्या आईसोबतचं बाँडिंग खूप खास होतं. ती कायमच आईच्या अत्यंत जवळ होती. कृष्णा मुखर्जी यांनी राणीला तिच्या करियरसाठी विशेष मदत केली होती. राणीच्या कोणत्याही चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग असो, त्या कार्यक्रमासाठी कायमच उपस्थित राहायच्या.