Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Coastal Road Crash : बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या शनय गज्जलची आधीची अरेरावी समोर; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Mumbai Coastal Road Crash : बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या शनय गज्जलची आधीची अरेरावी समोर; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

0
Mumbai Coastal Road Crash : बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या शनय गज्जलची आधीची अरेरावी समोर; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

मुंबई : मुंबईतील हाय-प्रोफाइल कोस्टल रोडवर रविवारी पहाटे घडलेल्या भीषण कार अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अतिवेगातील बीएमडब्ल्यू (BMW) कारचा झालेल्या या भयानक अपघातात तीन तरुण विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. शनय गज्जल (21), आदित्य जकासनिया (19) आणि धैर्य सेठ (17) अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत, तर आदित्य ओसवाल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर आता मृत चालक शनय गज्जलबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Mumbai Coastal Road Accident)

https://www.prahaar.in/2026/09/21/cm-devendra-fadnavis-country-specific-skill-passports-will-be-created-to-supply-skilled-manpower-to-the-world-chief-minister-devendra-fadnavis/

आधीच्या गुन्ह्यांचा आणि अरेरावीचा इतिहास

कोस्टल रोडवर झालेल्या अपघातातील सर्व तरुण मूळचे अहमदाबादचे असून ते मुंबईत आर्किटेक्चर आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेत जुहू-सांताक्रूझ परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. दरम्यान, अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा शनय गज्जल हा यापूर्वीही मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Mumbai Coastal Road Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी 29 मार्च रोजी ताडदेव येथील रहिवासी ओमकार शिर्के यांच्या गाडीला शनयने जोरदार धडक दिली होती. याप्रकरणी गावदेवी आणि वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्या जुन्या घटनेच्या वेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मद्याच्या नशेत असलेला शनय हा शिर्के दाम्पत्याशी अत्यंत उद्धटपणे आणि अरेरावीच्या भाषेत भांडताना स्पष्टपणे दिसत आहे. (Mumbai Coastal Road Accident)

https://www.prahaar.in/2026/09/21/national-curriculum-for-healthcare-education-to-be-implemented-from-this-year-rollout-by-the-state-government/

फॉरेन्सिक अहवालाकडे लक्ष

कोस्टल रोडवरील ताज्या अपघाताच्या वेळी या विद्यार्थ्यांनी पुन्हा मद्यसेवन केले होते का, याबाबत पोलिसांना दाट संशय आहे. या अनुषंगाने पोलिसांनी चौघांच्याही रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. या फॉरेन्सिक अहवालातून नेमके काय समोर येणार, याकडे आता संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. (Mumbai Coastal Road Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here