Home ब्रेकिंग न्यूज Health Education : आरोग्यसेवा शिक्षणात राष्ट्रीय अभ्यासक्रम यंदापासून लागू होणार – राज्य सरकारकडून अंमलबजावणी

Health Education : आरोग्यसेवा शिक्षणात राष्ट्रीय अभ्यासक्रम यंदापासून लागू होणार – राज्य सरकारकडून अंमलबजावणी

0
Health Education : आरोग्यसेवा शिक्षणात राष्ट्रीय अभ्यासक्रम यंदापासून लागू होणार – राज्य सरकारकडून अंमलबजावणी
Mantralay

चार स्वायत्त मंडळांमुळे शिक्षण, मूल्यांकन आणि नोंदणीला सुसूत्रता

मुंबई : राज्यातील सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि नियमन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र राज्य सहयोगी व आरोग्यसेवा परिषदे’च्या कामकाजाला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर परिषदेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, राष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाराष्ट्रात लागू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.(National Curriculum Health Education)

https://www.prahaar.in/2026/09/21/ranveer-singh-and-deepika-padukone-old-comments-on-family-planning-go-viral-birth-of-their-second-child/

सहयोगी आरोग्यसेवा क्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा, व्यावसायिक मानके आणि सेवांचे नियमन यासाठी ही परिषद काम करणार आहे. संस्थांचे मूल्यांकन, व्यावसायिकांची राज्यस्तरीय नोंदणी तसेच आधुनिक वैज्ञानिक प्रगतीचा आरोग्यसेवेत स्वीकार यांचाही परिषदेच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील शिक्षण आणि कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी परिषदेअंतर्गत चार स्वायत्त मंडळे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पदवीपूर्व सहयोगी व आरोग्यसेवा शिक्षण मंडळ, पदव्युत्तर सहयोगी व आरोग्यसेवा शिक्षण मंडळ, सहयोगी व आरोग्यसेवा व्यवसाय मूल्यांकन व मानांकन मंडळ तसेच सहयोगी व आरोग्यसेवा व्यवसाय आचारसंहिता व नोंदणी मंडळ यांचा समावेश आहे.(National Curriculum Health Education)

https://www.prahaar.in/2026/09/21/a-major-dussehra-gift-for-india-india-new-zealand-free-trade-agreement-to-come-into-effect-from-october-20/

सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ यांसह ५० हून अधिक विषयांमध्ये प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत अभ्यासक्रम राज्यात लागू झाल्यानंतर या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुसंगत आणि मानकीकृत शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, मूल्यांकन, मानांकन, आचारसंहिता आणि नोंदणी या विविध बाबींना स्वतंत्र संस्थात्मक चौकट मिळणार आहे. त्यामुळे सहयोगी आरोग्यसेवा क्षेत्रात व्यावसायिक मानके निश्चित करण्याबरोबरच नोंदणी आणि नियमनाची व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यावर भर राहणार आहे.(National Curriculum Health Education)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here