Home साप्ताहिक अर्थविश्व Moneyview Limited चा IPO 24 सप्टेंबरपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत किती असेल?

Moneyview Limited चा IPO 24 सप्टेंबरपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत किती असेल?

0
Moneyview Limited चा IPO 24 सप्टेंबरपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत किती असेल?

मुंबई: मनीव्ह्यू लिमिटेडचा (Moneyview Limited) प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (IPO) 24 सप्टेंबरपासून विक्रीसाठी खुला होतोय. ह्या IPO साठी 28 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. IPO साठी एका शेअर्सची किंमत 32 ते 34 रुपये इतकी असणार आहे. प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य 1 रुपया असेल. तर, अँकर गुंतवणूकदारांना हा नवा IPO २३ सप्टेंबर रोजी विक्री करू शकणार आहेत.

गुंतवणूकदारांना किमान 441 समभागांसाठी बोली लावावी लागणार आहे, त्यानंतर गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे. कंपनीच्या IPO मध्ये 750 कोटी रुपयांचा नवीन समभाग विक्रीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.  सध्याच्या भागधारकांसाठी 10 कोटी 04 लाख 94 हजार 200 समभागांपर्यंतचा ऑफर फॉर सेल करण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/20/an-iconic-week-18-new-ipos-coming-to-the-stock-market-shares-of-14-companies-to-be-listed/

ऑफर फॉर सेलमध्ये पुनीत अग्रवाल आणि संजय अग्रवाल प्रत्येकी 1 कोटी 35 लाख 48 हजार 300 पर्यंतचा समभाग, तर चित्रा अग्रवाल 19 लाख 35 हजार 400 पर्यंतचा समभाग विक्रीसाठी काढणार आहे. याशिवाय विविध गुंतवणूकदार भागधारकांकडूनही समभागांची विक्री केली जाणार आहे.

IPO तील 50 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) उपलब्ध असेल. तसेच किमान 15 टक्के हिस्सा बिगर- संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि किमान 35 टक्के हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (RII) राखीव असेल.

अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व गुंतवणूकदारांना ASBA प्रक्रियेद्वारे अर्ज करणे बंधनकारक आहे. UPIद्वारे अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम संबंधित बँक खात्यात ब्लॉक केली जाईल.

https://www.prahaar.in/2026/09/19/port-talbot-project-costs-rise-tata-steel-seeks-additional-funding-from-uk-government/

मनीव्ह्यू लिमिटेडचे समभाग बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. Axis Capital, BofA Securities India, IIFL Capital Services आणि Kotak Mahindra Capital Company हे या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

मनीव्ह्यू लिमिटेडचे समभाग बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

Axis Capital Limited, BofA Securities India Limited, IIFL Capital Services Limited (पूर्वीचे IIFL Securities Limited) आणि Kotak Mahindra Capital Company Limited हे या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

कंपनीने 20 सप्टेंबर 2026 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केला आहे. आयपीओसाठी बोली प्रक्रिया 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. त्यानंतर UPI मँडेटची व्यवस्था बंद करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here