Home ब्रेकिंग न्यूज Mumbai News: मुंबईतील बंद कबुतरखाने तात्काळ उघडा, जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा अल्टीमेटम

Mumbai News: मुंबईतील बंद कबुतरखाने तात्काळ उघडा, जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा अल्टीमेटम

0
Mumbai News: मुंबईतील बंद कबुतरखाने तात्काळ उघडा, जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा अल्टीमेटम

मुंबई: मुंबईतील बंद करण्यात आलेले सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी आरोग्याच्या कारणास्तव आणि नागरिकांच्या तक्रारींमुळे मुंबईतील विविध भागांतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावरून मोठा राजकीय व सामाजिक वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुनी निलेशचंद्र महाराज यांनी सरकारला घरचाआहेर देत आक्रमक भूमिका घेतली आहे.

याप्रकरणी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनादरम्यान जैन समाजाला कबुतरांच्या प्रश्नी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्यापही पायधुनी येथील गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरासह शहरातील सर्व कबुतरखान्यांमधील दाणा-पाणी बंद आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा हे जाणीवपूर्वक जैन समाजाचा आवाज दाबण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

येत्या काळात हे कबुतरखाने पूर्ववत सुरू न झाल्यास गोडीजी मंदिरासमोर भव्य आंदोलन आणि आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिली जाणार असून, त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असे मुनी निलेशचंद्र महाराज यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here