Home क्राईम Lalbaugcha Raja : सावध राहा! लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट; समोर आला धक्कादायक प्रकार!

Lalbaugcha Raja : सावध राहा! लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट; समोर आला धक्कादायक प्रकार!

0
Lalbaugcha Raja : सावध राहा! लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट; समोर आला धक्कादायक प्रकार!

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाचे जलद चरणस्पर्श दर्शन घडवून देण्याचे सांगून 4 भाविकांकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी 18 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रणव सुरेशकुमार यादव असे या तरुणाचे नाव असून तो परळ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

या प्रकरणी 20 वर्षीय विद्यार्थी इक्बाल असामोहम्मद मन्सूरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारासह त्याचे 3 मित्र लालबागच्या राजाचे चरणस्पर्श दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यांना लवकर दर्शन हवे असल्याने ते त्यासाठी मार्ग शोधत होते.

https://www.prahaar.in/2026/09/21/come-back-early-next-year-18818-idols-immersed-on-the-seventh-day-of-ganesh-visarjan-no-untoward-incidents-reported/

19 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 1.45 वाजता हे चौघे मॅग्नम टॉवरच्या गेटजवळ गेले असता त्यांची प्रणव यादव याच्याशी भेट झाली. यादवने आपण चौघांसाठी लवकर चरणस्पर्श दर्शनाची व्यवस्था करू शकतो, असे सांगितल्याचा आरोप आहे. यासाठी त्याने प्रत्येकी 850 रुपये, असे एकूण 3,400 रुपये मागितले.

त्यानंतर भाविकांनी ऑनलाइन माध्यमातून 800 रुपये दिले, तर उर्वरित 2,600 रुपये रोख दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पैसे घेतल्यानंतर यादवने दर्शनाची व्यवस्था करून देतो, असे सांगून तेथून निघून गेला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो परत आला नाही.

जवळपास 2 तास वाट पाहिल्यानंतर भाविकांनी यादवचा शोध घेतला. तो गर्दीत आढळल्यानंतर त्यांनी दर्शनाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने कोणताही पास किंवा दर्शनाची व्यवस्था नसल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पैसे परत करण्यासही त्याने नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर चौघांनी यादवला काळाचौकी पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी बीएनएस कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here