मुंबई: टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली कुमार यांचा आज (21 सप्टेंबर) वाढदिवस असतो. या खास दिवशी त्यांना आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट मिळालं आहे. त्यांना कोणी खास गिफ्ट दिलं नसून त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. तो सुद्धा ऐन त्यांच्या वाढदिवशीच हा रेकॉर्ड रचण्यात आला आहे. दिग्दर्शक ॲटली ह्यांना त्यांच्या वाढदिवशी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं आहे. ॲटली यांचा आगामी चित्रपट ‘राका’ने प्रदर्शनापूर्वीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये प्रवेश केला आहे. यामुळे दिग्दर्शकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/21/grand-preparations-for-the-72nd-national-film-awards-ceremony-preparations-in-the-final-stages-excitement-within-the-film-industry/
सोमवारी, सन पिक्चर्सने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली की, ‘राका’या चित्रपटाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. निर्मात्यांनी सांगितले की, ‘राका’ने रिअल-टाइममध्ये सर्वाधिक लोकांचे मोशन-कॅप्चर केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शन दिले की, “इतिहास रचला आहे, हा एक जागतिक विजय आहे, जो भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर घेऊन जातो. ‘राका’ने एकाच वेळी ३७ कलाकारांचे मोशन-कॅप्चर करून, रिअल-टाइममध्ये सर्वाधिक लोकांचे मोशन-कॅप्चर करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अल्लू अर्जुन आणि ॲटली यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र मिळाले आहे.”
View this post on Instagram
या पोस्टनंतर, मेकर्सकडून कशापद्धतीने त्यांनी फोटो कॅप्चर केले, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये परदेशी टीमसोबत लहान मुले एका ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण करताना दिसत आहेत. बीटीएस व्हिडिओपासून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंतच्या या प्रवासाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर फॅन्सकडून चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मिडिया हँडलवर ॲटलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा खास क्षण शेअर करताना अल्लू अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझे दिग्दर्शक ॲटली गरू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासारख्या दूरदृष्टी आणि क्षमतेच्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे. भविष्यात आणखी काही उत्तम गोष्टी करण्यासाठी उत्सुक आहे.”
https://www.prahaar.in/2026/09/21/actor-kishor-kadam-shared-his-experience-of-working-in-director-santosh-davkhars-film-gondhal-which-has-been-selected-as-indias-official-entry-for-the-oscar-2027/
अल्लू अर्जुनच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त, निर्मात्यांनी चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. या फर्स्ट लूकमध्ये अभिनेत्याचा चित्रपटातला बाल्ड लूक प्रेक्षकांसमोर आला. लूक पाहून फॅन्सला चित्रपटाची उत्सुकता आहे. ॲटली दिग्दर्शित चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.