Home ब्रेकिंग न्यूज Mumbai News : बोरीवली पश्चिमेला मुर्दा गल्लीतील जिनाही बनणार सरकता

Mumbai News : बोरीवली पश्चिमेला मुर्दा गल्लीतील जिनाही बनणार सरकता

0
Mumbai News : बोरीवली पश्चिमेला मुर्दा गल्लीतील जिनाही बनणार सरकता

रेल्वे स्थानकासह स्कायवॉकही पादचारी पुलाला जोडणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): बोरीवली रेल्वे स्थानकासमोर गोरा गांधी हॉटेल समोरील स्कायवॉकला जोडण्यासाठी सरकता जिना बसविण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर आता बोरीवली पश्चिम येथील मुरदा गल्लीजवळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सार्वजनिक पादचारी पुलाच्या जिन्याच्या जागेवरही सरकते जिने बसवले जाणार आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,महानगरपालिकेच्या आर/मध्य प्रभाग अंतर्गत येणाऱ्या बोरीवली पश्चिम येथील मुरदा गल्ली येथे १ नग उच्च क्षमतेचा सरकता जीना बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सध्याचा सार्वजनिक पादचारी पूल बोरीवली रेल्वे स्टेशन पुलाला जोडलेला आहे. रेल्वे प्रवासी, वृध्द व्यक्ती आणि स्थानिक नागरीकांच्या सोयीसाठी सार्वजनिक सरकता जिना मुरदा गल्ली जवळील बोरीवली पश्चिम येथील सार्वजनिक उड्डाण पुलाला जोडणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत या ठिकाणी सरकता जिना नाही. सदर प्रस्तावित सरकत्या जिन्याला सध्याच्या स्कायवॉकला जोडण्यात येणार आहे. मुरदा गल्ली जवळ साडे आठ मीटर उंचीचा हा सरकता जीना व त्या वरील छप्पर आदी व्यवस्थेसह याची उभारणी केली जाणार आहे. या कामांसाठी दत्तगुरु एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ३.३८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/20/shocking-horrific-accident-on-mumbai-coastal-road-bmw-crashes-3-youths-killed-one-critically-injured/

मागील मार्च महिन्यात बोरीवली पश्चिम येथील स्कायवॉकचा विद्यमान हा गोरा गांधी आहे, त्याठिकाणी असून त्याठिकाणी सरकता जिना बसवण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यासाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here