Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : “जेवढे तोंड उघडाल, तेवढा मालकाचा मुलगा…”; मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात

Nitesh Rane : “जेवढे तोंड उघडाल, तेवढा मालकाचा मुलगा…”; मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात

0
Nitesh Rane : “जेवढे तोंड उघडाल, तेवढा मालकाचा मुलगा…”; मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबई : विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांवर आणि राजकीय वक्तव्यांवर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अत्यंत तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाचे नेते रोज तेच तेच जुने आरोप करून केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा थेट दावा राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

“सत्तेत असताना चौकशी का केली नाही ?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्ष एकाच मुद्द्यावर जुनी टेप रेकॉर्डर वाजवल्यासारखे आरोप करत आहेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि सत्ता हातात असताना त्यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी का केली नाही ? चौकशी करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते ?” सत्ता हातात असताना काहीही करायचे नाही आणि आता रोज तीच तीच वक्तव्ये करून लोकांचा वेळ वाया घालवायचा, या प्रकाराला जनता आता पूर्णपणे वैतागली आहे, असेही ते पुढे म्हणाले.

“राजकारण न करता न्यायाला प्राधान्य द्या”

या संवेदनशील प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहण्याचे स्पष्ट आवाहन करत मंत्री नितेश राणे म्हणाले की, ही एका बापाची आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड आणि कायदेशीर लढाई आहे. सध्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे या विषयावर कोणत्याही राजकीय नेत्याने अनावश्यक वक्तव्ये करून राजकारण करू नये.

संजय राऊतांना ‘मैत्रीपूर्ण सल्ला’

विरोधी नेत्यांना कडक इशारा देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “तुमचे नेते आणि संजय राऊत जेवढे तोंड उघडतील, तेवढा त्यांच्या मालकाचा मुलगा अधिक अडचणीत येत जाईल. तुम्ही जेवढे या विषयावर बोलाल, तेवढा पोलिसांना आदित्य ठाकरे यांची चौकशी आणि अटकेची कारवाई करण्याचा मार्ग अधिक मोकळा होईल.” त्यामुळे संजय राऊत यांनी आता तरी गप्प राहावे आणि आपल्या मालकाच्या मुलाला सुरक्षित ठेवावे, असा ‘मैत्रीपूर्ण सल्ला’ही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here