Home ब्रेकिंग न्यूज Bhootam Bhayam : ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिली फिल्म आता घरबसल्या; ‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबरपासून OTTवर रिलीज

Bhootam Bhayam : ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिली फिल्म आता घरबसल्या; ‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबरपासून OTTवर रिलीज

0
Bhootam Bhayam : ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिली फिल्म आता घरबसल्या; ‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबरपासून OTTवर रिलीज

मुंबई : सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिलीच फिल्म ‘भूतम् भयम्’ आता OTTवर दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. भय, विनोद, रहस्य आणि साहस यांचा अनोखा मिलाफ असलेली ही मराठी फिल्म २५ सप्टेंबर २०२६ पासून ZEE5 वर पाहता येणार आहे. २४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी ही फिल्म OTTवर येत आहे. (Bhootam Bhayam)

प्राचीन नाणं अन् सोन्याची लालसा

नेहमीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळ्या धाटणीची कथा ‘भूतम् भयम्’मध्ये पाहायला मिळते. कोणतीही वस्तू सोन्यात बदलण्याची शक्ती असल्याचं मानलं जाणारं एक प्राचीन आणि रहस्यमय नाणं या कथेच्या केंद्रस्थानी आहे. सात बेरोजगार मित्रांच्या हाती हे नाणं लागतं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं. (Bhootam Bhayam)

झटपट श्रीमंत होण्याची संधी म्हणून हे मित्र त्या नाण्याकडे पाहतात. मात्र, त्यांची ही लालसा त्यांना राणीवाडा या ओसाड हवेलीपर्यंत घेऊन जाते. हवेलीमध्ये पोहोचल्यानंतर तिथे दडलेली रहस्ये हळूहळू समोर येऊ लागतात. (Bhootam Bhayam)

https://www.prahaar.in/2026/09/19/the-mysteries-of-karma-reincarnation-and-death-what-exactly-is-hidden-in-the-poster-of-mrityuchakra/

नाण्यासोबत शतकांपूर्वीचा शापही!

संपत्तीच्या मोहात पुढे गेलेल्या या मित्रांना नाण्यासोबत शतकानुशतके जुना शाप जोडलेला असल्याचं समजतं. त्यातच त्यांचा मित्र गजा अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता होतो. त्यानंतर परिस्थिती अधिकच भयावह बनते आणि मित्रांना हवेलीतील अलौकिक शक्तींचा सामना करावा लागतो.

भयावह प्रसंगांसोबतच विनोदी गोंधळ आणि अनपेक्षित वळणं यामुळे ‘भूतम् भयम्’ची कथा हॉरर-कॉमेडीच्या चौकटीत वेगळी ठरते. मैत्री, लोभ आणि जगण्यासाठीची धडपड या तीन गोष्टी कथानकाला पुढे नेतात. (Bhootam Bhayam)

https://www.prahaar.in/2026/09/19/golmaal-5-release-date-when-will-golmaal-5-be-released-rohit-shetty-makes-a-big-announcement/

नव्या पिढीतील कलाकारांची फौज

फिल्ममध्ये छाया कदम, पुष्कराज चिरपुटकर, करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे आणि शुभम जाधव यांच्यासह नव्या पिढीतील अनेक कलाकार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

रामचंद्र गावकर यांनी या फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. थिएटरनंतर आता ‘भूतम् भयम्’चा थरार OTT प्रेक्षकांना अनुभवता येणार असून, २५ सप्टेंबर २०२६ पासून ZEE5 वर ही फिल्म स्ट्रीम होणार आहे. (Bhootam Bhayam)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here