Home क्राईम Ratnagiri car fire : रत्नागिरीत खळबळ! कौटुंबिक वादातून लॉजच्या पार्किंगमध्ये उभी केलेली क्रूझर गाडी पेटवली; संशयितावर गुन्हा दाखल

Ratnagiri car fire : रत्नागिरीत खळबळ! कौटुंबिक वादातून लॉजच्या पार्किंगमध्ये उभी केलेली क्रूझर गाडी पेटवली; संशयितावर गुन्हा दाखल

0
Ratnagiri car fire : रत्नागिरीत खळबळ! कौटुंबिक वादातून लॉजच्या पार्किंगमध्ये उभी केलेली क्रूझर गाडी पेटवली; संशयितावर गुन्हा दाखल
Ratnagiri car fire

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाच्या क्रूझर वाहनाची तोडफोड करून ते पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ratnagiri car fire)

नेमकी घटना काय?

कडेगाव (जि. सांगली) येथील अशोक नागाप्पा गोठेकर (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांचे मित्र अशोक बागडे यांच्या मुलीचा आणि जावयाचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत आले होते. त्यासाठी त्यांनी राहुल काटकर यांची क्रूझर गाडी (एमएच-१०-बीएन-७१५२) आणली होती. नातेवाइकांची सायंकाळची बैठक निष्फळ ठरल्याने हा विषय शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर मांडण्याचे ठरले होते. त्यानंतर गोठेकर आठवडा बाजार परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबले व त्यांनी आपली गाडी लॉजच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.

सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकार उघड

गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पार्किंगमधील या गाडीला अचानक आग लागल्याचे समोर आले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली, परंतु तोपर्यंत वाहनाचे प्रचंड नुकसान झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, संशयित आरोपी आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) याने वाहनाच्या काचा फोडून ज्वलनशील पदार्थाच्या साहाय्याने गाडी पेटवून दिल्याचे निष्पन्न झाले.(Ratnagiri car fire)

https://www.prahaar.in/2026/09/19/raigad-shaken-minor-girl-sexually-assaulted-by-monsters-two-arrested-thanks-to-the-prompt-action-of-neral-police/

पोलीस कारवाई

मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आकाश खेत्री याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.(Ratnagiri car fire)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here