मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग केल्यापासून नवनवीन अपडेट समोर येत आहेत. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आज दुपारी मातोश्री परिसरामध्ये दाखल झाले आहेत. आज दुपारी ४ वाजता मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांना भेटणार असं ते म्हणाले होते. सतीश सालियन यांच्या वकिलांकडून आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना कलानगरच्या गेटवरच मानहानीची नोटीस देण्यात आली आहे. नोटीस व्यवस्थित वाचून त्या नोटीसला लवकरच उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या वकिलांनी दिलेली आहे. सतीश सालियन मातोश्री परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे.
https://www.prahaar.in/2026/09/19/the-more-you-open-your-mouth-the-more-trouble-the-bosss-son-will-land-in-minister-nitesh-ranes-scathing-attack-on-sanjay-raut/
सतिश सालियन म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. सीबीआयकडून प्रत्येक संशयितांची चौकशी केली जाणार आहे. वेळेप्रमाणे प्रत्येक संशयिताला चौकशीसाठी बोलवले जाईल. येत्या सोमवारी मी संपूर्ण प्रकरणाबद्दल माध्यमांना माहिती सांगणार आहे. सतिश सालियन, त्यांचे वकील निलेश ओझा आणि त्यांची संपूर्ण टीम मातोश्री परिसरामध्ये दाखल झाले आहे. त्यांनी ठाकरेंच्या वकिलांना नोटीस सुद्धा दिलेली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते. शिवसैनिकांकडून सालियन आणि त्यांच्या वकिलांना मातोश्रीकडे जाण्यासाठी विरोध केला जात होता. कलानगरच्या गेटजवळच सतीश सालियन आणि त्यांच्या वकिलांना अडवण्यात आलं.
https://www.prahaar.in/2026/09/19/shiv-sena-launches-a-scathing-attack-on-uddhav-thackeray-through-a-caricature-takes-aim-by-saying-londons-success-rankles-hence-the-stomach-ache/
सतीश सालियन आणि त्यांच्या वकिलांनी ठाकरेंना बजावलेली नोटीस घेऊन ठाकरेंचे वकिल मातोश्रीवर दाखल झाले आहेत. लवकरच त्यांच्याकडूनही उत्तर येण्याची शक्यता आहे. सतिश सालियन यांनी आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकला आहे. सतीश सालियन यांनी ५०० कोटींचा मानहानीचा दावा केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सहा वर्षांनंतर आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा केला जात आहे, हा राजकीय स्टंट आहे का? असा प्रश्न माध्यमांनी सतिश सालियन यांना विचारला असता त्यांनी हा राजकीय स्टंट नाही, अशी प्रतिक्रिया दिली. येत्या सोमवारी सतिश सालियन यांच्याकडून माध्यमांना आणखी कोणती नवीन माहिती दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.