मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, डॉ. आर एन कुपर रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय समूह, संत मुक्ताबाई महानगरपालिका रुग्णालय, हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर महानगरपालिका रुग्णालय या रुग्णालयांच्या उपहार गृहांमध्ये कोणत्याही प्रकारची आजवर अग्निसुरक्षेची काळजी घेतली जात नव्हती. परंतु आता यासर्व रुग्णालये आणि उपहारगृहे ही अग्नि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षित केली जाणार असून या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.(BMC Hospital News)
https://www.prahaar.in/2026/09/19/immersion-of-mumbais-most-expensive-ganpati-a-heartfelt-farewell-to-gsb-seva-mandals-bappa/
मुंबई महापालिकेच्या येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, डॉ. आर एन कुपर रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय समूह, संत मुक्ताबाई महानगरपालिका रुग्णालय, हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विविध वार्ड, आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अपघात विभाग इ. मार्फत अविरतपणे रुग्णांना सेवा दिली जाते. हे विभाग, रुग्णालये २४ तास कार्यरत असतात. त्यामुळे रुग्णसेवेशी संबंधित विविध मशिन्स या उच्च विद्युत दाबावर चालणा-या यंत्राचा वापर सतत सुरु असतो. त्यासाठी याठिकाणी आवश्यकतेनुसार मध्यम व उच्च क्षमतेचे विद्युत पॅनल्स, विद्युत स्विचबोर्ड, एमसीबी बोर्ड बसविण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये महानगरपालिका कर्मचा-यांकरीता आणि रुग्णांकरीता उपाहारगृह उपलब्ध आहेत व ही उपाहारगृहे सतत कार्यरत असतात.
या रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा, मनपा कर्मचारी तसेच अधिकारी यांचा सतत वावर असतो. या सततच्या वापरामुळे विद्युत पॅनल्स, विद्युत स्विचबोर्ड, एमसीबी बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट तसेच तत्सम विद्युत बिघाडामुळे लागणारी आग पॅनलच्या बाहेर पसरण्याचा धोका संभवतो, याचप्रमाणे उपाहारगृहात जेवण बनवताना गॅस शेगडीमध्ये मोठ्या व उच्च तापमानाच्या ज्वाला आणि तीव्र उष्णता निर्माण होत असते. यामुळे शेगडीच्या आजूबाजूला जेवण बनवताना पडलेल्या खाद्य तेलामुळे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.(BMC Hospital News)
https://www.prahaar.in/2026/09/19/gadkari-claims-the-highway-remains-pothole-free-even-after-27-years-a-10-lane-option-is-being-discussed-to-handle-rising-traffic/
त्यामुळे शीव महानगरपालिका रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय समूह, संत मुक्ताबाई महानगरपालिका रुग्णालय, ट्रॉमा केयर महानगरपालिका रुग्णालय या विभागांकडून विद्युत पॅनल्स, विद्युत स्विचबोर्ड, एमसीबी बोर्डमध्ये आणि उपाहारगृहांमध्ये आग लागून दुर्घटना होऊ नये व नागरिकांना देण्यात येणा-या सेवांमध्ये खंड पडू नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने विभागांमधील विद्युत पॅनलमध्ये डिपीपी स्वतंत्र यंत्रणा व विद्युत सिबोर्ड एमसीबी बोर्डमध्ये माक्रो इंजिनीयरींग सेल्फ कंन्टेन्ट कंबाइन टेक्नोलॉजी बॉन्ड आणि उपाहारगृहांमध्ये केएफडी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आग लागल्यामुळे होणा-या मानवी जीवित हानी तसेच वित्तीय हानी रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.या यंत्रणा स्वयंचलित आहेत. यासाठी अजंता इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एल.एल.पी. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे २.३६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.(BMC Hospital News)