खेळता खेळता कारमध्ये शिरला अन्…
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंश सुरज केळझरकर हा चार वर्षांचा मुलगा नेहमीप्रमाणे घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो शेजारी उभ्या असलेल्या कारजवळ गेला. त्याने कारचा दरवाजा उघडला आणि तो आतमध्ये शिरला. मात्र, काही वेळाने कारचा दरवाजा आतून लॉक झाला. अंशला तो दरवाजा पुन्हा उघडता आला नाही. त्यामुळे तो बराच वेळ बंद कारमध्येच अडकून राहिला.
https://www.prahaar.in/2026/09/18/after-the-ganpati-aarti-castor-seeds-were-consumed-as-prasad-and-a-horrific-incident-unfolded-13-children/
मुलगा दिसेना म्हणून कुटुंबीयांची शोधाशोध
अंश बराच वेळ घरासमोर दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यांनी घराच्या आजूबाजूचा परिसर तसेच इतर ठिकाणी शोधाशोध केली. मात्र, शेजारी उभ्या असलेल्या कारकडे सुरुवातीला कुणाचेही लक्ष गेले नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अंश कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. बंद कारमध्ये बराच वेळ अडकल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू, मात्र प्राणज्योत मालवली
कुटुंबीयांनी तातडीने अंशला कारमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान अंशचा मृत्यू झाला. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने केळझरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.