Home महाराष्ट्र ठाणे Thane News : ठाण्यात भीषण दुर्घटना! ५ झोपड्यांना आग लागून सिलिंडरचा स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

Thane News : ठाण्यात भीषण दुर्घटना! ५ झोपड्यांना आग लागून सिलिंडरचा स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

0
Thane News : ठाण्यात भीषण दुर्घटना! ५ झोपड्यांना आग लागून सिलिंडरचा स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
Thane News

ठाण्यातील कळवा (पश्चिम) भागात शुक्रवारी सकाळी आगीची एक मोठी दुर्घटना घडली. खारेगाव पुलाजवळ आणि सहयोग सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या पाच तात्पुरत्या झोपड्यांना अचानक भीषण आग लागली. या आगीच्या भडक्यात एका झोपडीतील लहान एलपीजी (LPG) सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पाचही घरे आणि त्यातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे.

माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी

सकाळी ९:२३ वाजता ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या आगीबाबत फोनवरून माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान तातडीने मदतीसाठी घटनास्थळाकडे रवाना झाले.

झोपड्यांना कुलूप असल्याने टळला मोठा अनर्थ

https://www.prahaar.in/2026/09/18/deepika-padukone-and-ranveer-singh-siddhivinayak-temple-ritual-ahead-of-second-baby/

अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा आग लागलेल्या पाचही झोपड्या बाहेरून बंद होत्या. घरात कोणीही व्यक्ती हजर नसल्यामुळे जीवितहानी किंवा कोणीही जखमी होण्याचा मोठा धोका टळला. परंतु, आगीच्या तीव्रतेमुळे घरातील लहान सिलिंडरचा मोठा स्फोट झाला, ज्यामुळे आगीने अधिक रौद्ररूप धारण केले.

अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

दुर्टनेची बातमी मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. ताडवी, कळवा प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त ललिता जाधव आणि जवाहरबाग अग्निशमन केंद्राचे अधिकारी पासष्टे हे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचा १ बंब, २ बचाव वाहने, कळवा पोलीस आणि अतिक्रमण विभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले. अखेर सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर; तपासाचे आदेश

या दुर्घटनेत पाचही कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची सुरुवात नेमकी कशामुळे झाली, याचा सविस्तर तपास पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here