Home ब्रेकिंग न्यूज Kalyan- Kasara Block: कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी पुन्हा ब्लॉकचे संकट; शनिवारी घेणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

Kalyan- Kasara Block: कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी पुन्हा ब्लॉकचे संकट; शनिवारी घेणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

0
Kalyan- Kasara Block: कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी पुन्हा ब्लॉकचे संकट; शनिवारी घेणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक
special block will be taken for point tamping work on the up north east line near titwala station between kalyan and kasara stations on central railway late at night on 18th September And 19th September

कल्याण: मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा स्थानकावर येत्या शनिवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही उपनगरीय लोकल रद्द करण्यात आली असून शॉर्ट टर्मिनेशन आणि वेळेत बदल करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून प्रवाशांना बदललेले वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. बऱ्याचदा रात्री उशिरा अनेक नोकरदार घरी येतात. त्यांच्या सोयीने ही महत्त्वाची बातमी आहे.

https://www.prahaar.in/2026/09/18/close-call-at-jogeshwari-station-as-constable-saves-passenger-see-latest-viral-video/

मध्य रेल्वेकडून टिटवाळा स्थानकावर अप नॉर्थ ईस्ट मार्गावरील पॉइंट टॅम्पिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर (शनिवार) रोजी मध्यरात्री १२.४५ मिनिटांपासून मध्यरात्री २.१५ वाजेपर्यंत अशा दोन तासांसाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारच्या रात्री हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत कसारा ते कल्याण स्थानकादरम्यान उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून टिटवाळा स्थानकासाठी रात्री ११.१६ वाजताची आणि ११.४२ वाजताची सुटणारी लोकल आणि टिटवाळा स्थानकावरून ठाणे स्थानकासाठी जाणारी रात्रीची १०.२५ वाजताची आणि ११.१४ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर अनेक शॉर्ट टर्मिनेट करून चालवण्यात येणार आहे. काही ठराविक स्थानकापर्यंत लोकल चालवण्यात येणार आहे. डोंबिवली स्थानकावरून रात्री १० वाजता सुटणारी, डोंबिवली- मुंबई सीएसएमटी लोकल आणि कल्याण स्थानकावरून १०.०६ वाजता सुटणारी कल्याण- मुंबई सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.

शेवटच्या आणि पहिल्या उपनगरी ट्रेन्स

  • ब्लॉकपूर्वी डाऊन नॉर्थ ईस्ट मार्गावरील कसारा स्थानकाच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल मुंबई सीएसएमटी स्थानकावरून मध्यरात्री १२.०८ वाजता सुटेल.
  • ब्लॉकपूर्वी डाऊन नॉर्थ ईस्ट मार्गावरील टिटवाळा स्थानकाच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल मुंबई सीएसएमटी स्थानकावरून रात्री १०.५० वाजता सुटेल.
  • ब्लॉकपूर्वी अप नॉर्थ ईस्ट मार्गावरील मुंबई सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल कसारा स्थानकावरून रात्री १० वाजता सुटेल.
  • ब्लॉकपूर्वी अप नॉर्थ ईस्ट मार्गावरील ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल आसनगाव स्थानकावरून रात्री ११.०८ वाजता सुटेल.
  • ब्लॉकनंतर डाऊन नॉर्थ ईस्ट मार्गावरील कसारा स्थानकाच्या दिशेने जाणारी पहिली लोकल मुंबई सीएसएमटी स्थानकावरून पहाटे ४.१९ वाजता सुटेल.
  • ब्लॉकनंतर अप नॉर्थ ईस्ट मार्गावरील मुंबई सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने जाणारी पहिली लोकल कसारा स्थानकावरून पहाटे ३.५१ वाजता सुटेल.
  • ब्लॉकनंतर अप नॉर्थ ईस्ट मार्गावरील मुंबई सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने जाणारी पहिली लोकल टिटवाळा स्थानकावरून पहाटे ३.५६ वाजता सुटेल.

https://www.prahaar.in/2026/09/18/ganeshotsav-2026-mumbai-civic-body-issues-guidelines-on-food-safety-fire-safety-and-cleanliness/

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेवरील कल्याण- कसारा स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे विशेष ब्लॉकच्या कालावधीमध्ये प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीर व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here