Home ब्रेकिंग न्यूज अभिमानास्पद! Oscar 2027 च्या शर्यतीत मराठी चित्रपटाची निवड

अभिमानास्पद! Oscar 2027 च्या शर्यतीत मराठी चित्रपटाची निवड

0
अभिमानास्पद! Oscar 2027 च्या शर्यतीत मराठी चित्रपटाची निवड
Following the selection of the Gondhal movie for the Oscar 2027 director Santosh Davkhar announced that the movie would be re-released in Marathi as well as other languages

मुंबई: मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी अभिमानाची बातमी समोर येत आहे. २०२५ मध्ये रिलीज झालेला संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ चित्रपटाची (Gondhal Movie) ऑस्कर 2027च्या शर्यतीमध्ये निवड करण्यात आली आहे (Oscar 2027). हा मराठी सिनेमा परदेशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्राची लोककला आणि गोंधळ या दोन परंपरेचं चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आलं आहे. महाराष्ट्राची संस्कृती परदेशातल्या नागरिकांनाही पुन्हा एकदा पाहता येणार आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर करोडोंची उड्डाणे घेतलेला हा चित्रपट आता ऑस्करमध्येही नक्कीच आपली जादू दाखवेल, यामध्ये शंका नाही. (Marathi Movie)

https://www.prahaar.in/2026/09/18/shots-fired-at-range-rover-and-a-direct-threat-attack-on-diler-kharkiya-sparks-a-stir-in-haryana/

९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी अर्थात ऑस्कर २०२७ साठी (99th Academy Awards) ‘गोंधळ’चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ही बाब खरंतर फक्त ‘गोंधळ’चित्रपटाच्या टीमसाठी आनंददायी नसून संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी आनंदाची बातमी आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटगरीसाठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट ऑस्कर २०२७ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. स्थानिक संस्कृतीवर आधारित असलेल्या ‘गोंधळ’चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

महाराष्ट्रामध्ये ‘गोंधळ’ ही परंपरा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. गाव खेड्यापासून अगदी शहरातही गोंधळ घातला जातो. महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना गोंधळ हा प्रकार माहित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेला हा विषय पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणार आहे. लग्नानंतर वधु- वराच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते. (Maharashtrian Culture)

https://www.prahaar.in/2026/09/18/dont-act-in-court-the-supreme-court-reprimanded-rajpal-yadav-telling-him-this-is-your-last-chance/

चित्रपटाचा विषय, दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपटातील अनेक महत्त्वाच्या बाजू या सर्वांमुळे ‘गोंधळ’ चित्रपट मराठी संस्कृती जागतिक प्रेक्षकांसमोर ताकदीने सादर करणारा ठरतोय. याआधी फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६, इफ्फीमध्ये सिल्व्हर पिकॉक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, फिप्रेस्को पुरस्कार, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ्फ), झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटाची जादू ९९ व्या अकादमी पुरस्कारामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाने देशासह परदेशातही दमदार ठसा उमटवत मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

‘गोंधळ’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती डावखर फिल्म्सने केली. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here