Home ब्रेकिंग न्यूज Ganpati Visarjan 2026: गणपती विसर्जनासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर २२ जादा लोकल फेऱ्या, एका क्लिकवर जाणून घ्या टाईम टेबल

Ganpati Visarjan 2026: गणपती विसर्जनासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर २२ जादा लोकल फेऱ्या, एका क्लिकवर जाणून घ्या टाईम टेबल

0
Ganpati Visarjan 2026: गणपती विसर्जनासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर २२ जादा लोकल फेऱ्या, एका क्लिकवर जाणून घ्या टाईम टेबल
Ganpati Visarjan 2026 Central Railway will operate 22 additional local trains on the Kalyan–Mumbai CSMT, Thane–Mumbai CSMT, and Panvel–Mumbai CSMT routes

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेकडून लोकलची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई सीएसएमटी ते कल्याण, मुंबई सीएसएमटी ते ठाणे आणि मुंबई सीएसएमटी ते पनवेल स्थानकादरम्यान २२ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळातील सर्व विशेष लोकल धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे ह्या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. गणपती विसर्जनानंतर गणेशभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/18/special-block-will-be-taken-for-point-tamping-work-on-the-up-north-east-line-near-titwala-station-between-kalyan-and-kasara-stations-on-central-railway-late-at-night-on-18th-september-and-19th-septemb/

डाऊन मेन मार्गावर २३ सप्टेंबर- २४ सप्टेंबर (बुधवार/ गुरुवारची रात्र), २४ सप्टेंबर- २५ सप्टेंबर (गुरुवार/ शुक्रवारची रात्र) आणि २५ सप्टेंबर- २६ सप्टेंबर (शुक्रवार/शनिवारची रात्र)

  • मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०१:४० वाजता कल्याण स्थानकाकरिता विशेष लोकल सुटेल, जी कल्याण स्थानकावर मध्यरात्री ०३:१० वाजता पोहोचेल.
  • मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०२:३० वाजता ठाणे स्थानकाकरिता विशेष लोकल सुटेल, जी ठाणे स्थानकावर मध्यरात्री ०३:३० वाजता पोहोचेल.
  • तर, मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०३:२५ वाजता कल्याण स्थानकाकरिता आणखी एक विशेष लोकल सोडण्यात येणार आहे, जी कल्याण स्थानकावर पहाटे ०४:५५ वाजता पोहोचेल.

 

अप मेन मार्गावर २३ सप्टेंबर- २४ सप्टेंबर (बुधवार/ गुरुवारची रात्र), २४ सप्टेंबर- २५ सप्टेंबर (गुरुवार/ शुक्रवारची रात्र) आणि २५ सप्टेंबर- २६ सप्टेंबर (शुक्रवार/शनिवारची रात्र)

  • कल्याण स्थानकावरून रात्री उशिरा १२.०५ मिनिटांनी मुंबई सीएसएमटीकरिता विशेष लोकल सुटेल, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री ०१.३० वाजता पोहोचेल.
  • ठाणे स्थानकावरून मध्यरात्री १ वाजता मुंबई सीएसएमटीकरिता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री २ वाजता पोहोचेल.
  • तर, ठाणे स्थानकावरून मध्यरात्री २ वाजता मुंबई सीएसएमटीकरिता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल.

https://www.prahaar.in/2026/09/18/fear-of-air-pollution-in-mumbai-municipal-machinery-on-alert/

डाऊन आणि अप हार्बर मार्गावर २५ सप्टेंबर- २६ सप्टेंबर (शुक्रवार/शनिवारची रात्र)

  • मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०१.३० वाजता पनवेल स्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी पनवेल स्थानकावर मध्यरात्री ०२.५० मिनिटांनी पोहोचेल.
  • मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०२.४५ वाजता पनवेल स्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी पनवेल स्थानकावर पहाटे ०४.०५ मिनिटांनी पोहोचेल.
  • पनवेल स्थानकावरून मध्यरात्री १ वाजता मुंबई सीएसएमटीस्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री ०२.२० मिनिटांनी पोहोचेल.
  • पनवेल स्थानकावरून मध्यरात्री ०१.४५ वाजता मुंबई सीएसएमटीस्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर पहाटे ०३.०५ मिनिटांनी पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here