Home ब्रेकिंग न्यूज Hemant Dhome Post: नवरा असावा तर असा! पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; करीनाच्या चित्रपटातील कामावर अभिनेता फिदा

Hemant Dhome Post: नवरा असावा तर असा! पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; करीनाच्या चित्रपटातील कामावर अभिनेता फिदा

0
Hemant Dhome Post: नवरा असावा तर असा! पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; करीनाच्या चित्रपटातील कामावर अभिनेता फिदा

मुंबई: ‘रश्मी रॉकेट’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती क्षिती जोग हिने काम केलं आहे. मराठी सिनेविश्वात क्षितीने अनेक टेलिव्हिजन सिरियल आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर क्षिती सध्या बॉलिवूड चित्रपटांकडे वळताना दिसत आहे. अभिनेत्री क्षिती जोग अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘दायरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दायरा’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेने खास पत्नीसाठी इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे. हेमंतने पत्नीचं कौतुक करणारी खास पोस्ट शेअर केलेली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/18/no-cuts-no-breaks-a-massive-25-minute-one-take-scene-this-scene-from-gondhal-has-grabbed-everyones-attention/

अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “तुझ्या ताकदीचा ‘दायरा’, आपल्या माणसाचं काम आपण सेलिब्रेट केलंच पाहिजे! तेव्हा न लाजता बोलून घेतो! तू अफाट कॅलिबर असलेली अभिनेत्री आहेस, हे मला आणि अनेकांना माहित होतंच… पण आता जे ‘दायरा’ मधील तुझं काम बघतील तेही या यादीत जोडले जातील… जोडले जात आहेत… आज तुझं कौतुक बघून मन येड्यासारखं खूश आहे… क्षिती ही तर सुरूवात आहे… तुला अजून खूप काही करायचं आहे… माझ्यासकट सगळ्यांनाच तुझी अशीच सरस कामं बघायची आहेत… तू चाल पुढं… मी आहेच! तुझं प्रत्येक कमाल काम सेलिब्रेट करायला कायम… त्या अनेक टाळ्यांमधली सगळ्यात जोरात आवाज करणारी टाळी आपलीच असणार मालकीणबाई! खूप खूप प्रेम आणि प्रचंड अभिमान! LOVE YOU & SO SO SO PROUD OF YOU! You are a star! Rise. Reset. Repeat.”

 

पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये हेमंतने चाहत्यांना क्षितीचा ‘दायरा’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. करीना कपूर खान आणि पृथ्वीराज प्रमुख भूमिकेत असलेले ‘दायरा’ चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. ह्या संपूर्ण प्रकरणावर हा चित्रपट आधारित असून प्रकरण घडल्यापासून ते प्रकरणाचा तपास आणि आरोपींना शिक्षा कशा पद्धतीने देण्यात आली, याविषयावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक अनोख्या पद्धतीने सादर करण्याची कला दिग्दर्शकांनी दाखवली आहे. मेघना गुलजार ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या कथानकाचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. शिवाय, चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक प्रेक्षकांकडून केले जात आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कळेल.

https://www.prahaar.in/2026/09/18/a-computer-code-and-a-threat-to-the-nation-after-dhurandhar-this-emmy-winning-ott-series-is-sure-to-keep-you-hooked/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here