Home महत्वाची बातमी Nitesh Rane On Uddhav Thackeray: “आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग…”, दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nitesh Rane On Uddhav Thackeray: “आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग…”, दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

0
Nitesh Rane On Uddhav Thackeray: “आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग…”, दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय दौरा काढणाऱ्या उद्धव ठाकरेंचा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ‘आधी अंगावर लागलेला डाग पुसावा आणि मग असे दौरे काढावेत,’ अशी टीका राणे यांनी केली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे यांना दिशा सालियन प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या समाजमाध्यमावरील पोस्टविषयी विचारण्यात आले. त्यावर राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये मांडलेली भूमिका यापूर्वीच न्यायालयात मांडण्यात आली आहे. न्यायालयाने ती भूमिका स्वीकारलेली नसून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता समाजमाध्यमावर पोस्ट करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जाण्याची आणि सत्य काय आहे ते सांगण्याची वेळ आली असल्याचे राणे यांनी म्हटले.

https://www.prahaar.in/2026/09/17/pil-filed-in-high-court-seeking-to-name-parth-pawar-as-an-accused-in-the-mundhwa-land-scam-case-questions-raised-over-police-investigation/

उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, “एका महिलेच्या खुनाचा आणि सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींनी सामाजिक जीवनात येऊन अशा पद्धतीची भाषणे करावीत का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. उद्या दाऊदही बाहेर येऊन भाषण करेल आणि भारताचे भविष्य कसे घडवायचे, हे सांगेल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आधी अंगावर लागलेला डाग पुसावा आणि मग अशा पद्धतीचे दौरे काढावेत”, असे नितेश राणे यांनी सांगितले.

राऊतांनी उद्धव ठाकरेंना निवृत्तीचा सल्ला द्यावा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची ७५ पूर्ण केल्याने निवृत्ती घ्यावी, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, ‘‘निवृत्ती घ्यायची असेल तर संजय राजाराम राऊत यांच्या मालकाने घेतली पाहिजे. कारण आता मुलगा पण खून आणि बलात्काराच्या केसमध्ये अडकलेला आहे. हात खुनाने बरबटलेले आहेत. यांच्याच मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत खून आणि बलात्काराचे सगळे आरोप यांच्यावर झालेले आहेत. एफआयआरमध्ये नाव स्वतः उद्धव ठाकरे यांचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांना कोणतेही सल्ले देण्यापेक्षा संजय राऊत यांनी आधी आपल्या ‘मालकाला’ सल्ला द्यावा”, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

https://www.prahaar.in/2026/09/17/a-spark-ignited-in-vadnagar-sparked-a-revolution-across-india-a-tribute-to-prime-minister-narendra-modis-25-year-journey-of-service-deputy-chief-minister-eknath-shinde/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here