Home देश Terrorist Encounter : उधमपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत 2 दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरू

Terrorist Encounter : उधमपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत 2 दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरू

0
Terrorist Encounter : उधमपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत 2 दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरू
उधमपूर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवादाविरोधात कारवाई सुरूच आहे. उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम आणि घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी राबवलेल्या संयुक्त कारवाईत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. सैन्याला या भागात काही संशयित दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकाने बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास माजलता भागातील जंगलात शोधमोहीम सुरू केली. ( Terrorist Encounter)
https://www.prahaar.in/2026/09/17/upi-payment-will-upi-payments-become-costlier-when-buying-gold-and-silver-find-out-the-exact-rule-regarding-mdr/
सुरक्षा दलाचे जवान जंगलात पुढे जात असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या या चकमकीत 2 दहशतवादी मारले गेले. या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून, परिसरात अजूनही काही दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरूच आहे. ( Udhampur Encounter)
या घटनेच्या काही दिवस आधीच बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुखाचा खात्मा केला होता. यासिर असे मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव होते. तो गेल्या काही काळापासून या भागात सक्रिय होता. सुरक्षा यंत्रणा त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होत्या. योग्य वेळ साधून सैन्याने त्याला चकमकीत ठार केले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. उधमपूर आणि बडगाममधील या यशामुळे दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे. सीमावर्ती आणि दुर्गम भागात सैन्याची गस्त वाढवण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही अनुचित प्रकाराला वेळेत रोखता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here