मुंबई : प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून भाविकांचा जनसागर उसळला आहे. बाप्पाच्या चरणी लीन होणाऱ्या भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले जात असून, गणेशोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसांत तब्बल १.३७ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी उधळण करत एकट्या एका दिवसात ८८.९० लाख रुपयांचे दान दिले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/17/major-operation-by-security-forces-in-udhampur-2-terrorists-killed-in-encounter-search-operation-underway/
पहिल्याच दिवशी ४८.५० लाखांचे रोख दान आणि सोन्या-चांदीचे दागिने
दुसऱ्या दिवशी दानाचा आकडा वाढला; सोन्या-चांदीच्या दानातही मोठी वाढ
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी भाविकांच्या उत्साहात अधिकच भर पडली. या दिवशी ‘स्टेज’वरील दानपेटीत ५९.६० लाख रुपये तर ‘रांगेतील’ दानपेटीत २९.३० लाख रुपये जमा झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा एकूण रोख दानाचा आकडा ८८.९० लाख रुपयांवर पोहोचला. यासोबतच दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे अर्पण वाढले असून, भाविकांनी २२६.१२० ग्रॅम सोने आणि ५,५१६ ग्रॅम चांदी राजाच्या चरणी अर्पण केली.
येत्या दिवसांत दानाचा आकडा आणखी वाढणार
पहिल्या दोन दिवसांचे सोन्या-चांदीचे दागिने वगळता, केवळ रोख रक्कमेचा विचार केला तर हा आकडा १ कोटी ३७ लाख रुपयांवर गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी २४ तास भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत या दानामध्ये आणि सोन्या-चांदीच्या अर्पणात अजून मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.