Home महाराष्ट्र नाशिक Ashok Kharat Bail : भोंदू अशोक खरातच्या जामिनावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी ‘या’ दिवशी होणार

Ashok Kharat Bail : भोंदू अशोक खरातच्या जामिनावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी ‘या’ दिवशी होणार

0
Ashok Kharat Bail : भोंदू अशोक खरातच्या जामिनावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी ‘या’ दिवशी होणार

Ashok Kharat Bail : दैवी शक्तीचा दावा करत महिला भाविकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. बुधवारी (दि. 16) न्यायालयात या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता 30 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत खरातचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे.

उज्ज्वल निकमांकडून जामिनाला विरोध

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांनी न्यायालयात स्वतः हजर राहत खरातच्या जामीन अर्जाला विरोध केला. खरातविरोधातील गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा तपासात अडथळा निर्माण करू शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी खरातच्या बाजूने वकील उपस्थित नसल्याने बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडली जाऊ शकली नव्हती. आता 16 सप्टेंबरची सुनावणीही होऊ न शकल्याने जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/17/nashik-traffic-update-major-traffic-changes-in-nashik-during-ganeshotsav-no-vehicle-zones-on-these-routes/

खरातविरोधात आठ गुन्हे दाखल

खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर ग्रामीण पोलिस ठाण्यांमध्ये बलात्कार, फसवणूक, अवैध सावकारी आणि मनी लाँड्रिंगसह गंभीर कलमांखाली एकूण आठ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने तपास केलेल्या आठ प्रकरणांपैकी सहा प्रकरणांचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणत्या प्रकरणात जामीन अर्ज ?

सध्या खरातने सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) दाखल असलेल्या एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. खरातविरोधातील विविध प्रकरणांचा तपास आणि न्यायालयात दाखल झालेली दोषारोपपत्रे या पार्श्वभूमीवर आता 30 सप्टेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. त्या दिवशी सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि बचाव पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय खरातच्या जामीन अर्जावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here