Home मनोरंजन Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी… मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी… मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

0
Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी… मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज
Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज
प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचे सध्या इन्स्टाग्रामवर काही मराठमोळ्या अंदाजतले फोटो कमालीचे चर्चेत आले आहेत.
उर्फीने गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक मराठमोळा साज करत खास फोटोशूट केले आहे. तिच्या ह्या हटक्या फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले असून चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं जात आहे.
डार्क जांभळ्या रंगाची नऊवारी आणि लाल रंगाचा ब्लाऊज नेसून उर्फीने खूप सुंदर फोटोशूट केलं आहे. साडीच्या बॉर्डरवरील डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीच्या लूकचे सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे.
उर्फीने पारंपारिक लूकवर मराठमोळे दागिने परिधान करत सुंदर फोटोशूट केले आहे. उर्फीच्या निस्सिम सौंदर्यावर नेटकरी भाळले असून तिच्या फॅशनचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.
विचित्र कपडे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीला पारंपारिक लूकमध्ये पाहून फॅन्स थक्क झाले आहेत. ‘पारंपारिक लूकमध्ये छान दिसतेस’, असं म्हणत अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोंचे कौतुक केले.
उर्फीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here