Home ब्रेकिंग न्यूज Salman Khan Cryptic Post : भाईजानला काय झालं ? सलमानच्या पोस्टने चाहते काळजीत ; पोस्टमध्ये म्हणाला ‘कमी गोष्टी होत्या तेव्हा आनंदी होतो, आता…

Salman Khan Cryptic Post : भाईजानला काय झालं ? सलमानच्या पोस्टने चाहते काळजीत ; पोस्टमध्ये म्हणाला ‘कमी गोष्टी होत्या तेव्हा आनंदी होतो, आता…

0
Salman Khan Cryptic Post : भाईजानला काय झालं ? सलमानच्या पोस्टने चाहते काळजीत ; पोस्टमध्ये म्हणाला ‘कमी गोष्टी होत्या तेव्हा आनंदी होतो, आता…

Salman Khan Cryptic Post : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात डोक्यावर स्कार्फ बांधून हजेरी लावल्यानंतर सलमानने रात्री उशिरा इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुख, इच्छा, वेळ आणि आयुष्यातील अपूर्णतेच्या भावनेबद्दल विचार मांडले आहेत. सलमानच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, चाहते त्यामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही चाहत्यांनी सलमानच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही पोस्ट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर काही चाहते काळजी व्यक्त करत आहे.

सलमान खानने नेमकं काय म्हटलं ?

सलमान खानने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आयुष्यातील बदलत्या गरजा आणि मानवी इच्छांबद्दल भाष्य करण्यात आले आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, माणूस ज्या गोष्टींची एकेकाळी मनापासून इच्छा करतो, त्या मिळाल्यानंतर त्यांचे महत्त्व कमी झाल्यासारखे वाटते. पोस्टमध्ये वेळ, पैसा, भूक, झोप आणि बालपण यांचा उल्लेख करत आयुष्यातील विरोधाभास अधोरेखित करण्यात आला आहे. “जेव्हा वेळ होता तेव्हा पैसे नव्हते, आता पैसे आहेत तर वेळ नाही… लहानपणी मोठं होण्याची इच्छा होती, आता मोठं झाल्यावर बालपणाची ओढ लागली आहे,” अशा आशयाचे विचार त्यात मांडण्यात आले आहेत.

 

गणेशोत्सव कार्यक्रमानंतर शेअर केली पोस्ट

१४ सप्टेंबर रोजी सलमान खानने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. सर्वप्रथम त्याने भाऊ सोहेल खानच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सव सोहळ्यातही तो सहभागी झाला. या कार्यक्रमात सलमानचा ‘वॉन्टेड’ चित्रपटातील लूक पाहून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्याने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केल्याने चर्चांना वेग आला.

https://www.prahaar.in/2026/09/16/a-mistake-occurred-while-salman-khan-was-performing-the-aarti-during-the-ganpati-immersion-his-sister-arpita-stopped-him-midway-and-then/

सलमान खानच्या आगामी चित्रपटांची चर्चा

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, सलमान खान सध्या ‘मातृभूमी’ आणि ‘SVC63’ या चित्रपटांवर काम करत आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘मातृभूमी’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून, नव्या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही. तसेच, वामसी पैदिपल्ली दिग्दर्शित ‘SVC63’ या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, सलमान सध्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ चे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान, सलमानच्या या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, या पोस्टमागे नेमका काय संदेश आहे, याबाबत विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here