Home ब्रेकिंग न्यूज Kolhapur News : कळंबा कारागृहात कैद्यांचा उच्छाद; गोंधळ रोखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सहा जणांचा हल्ला, दगडफेकीत हाताला दुखापत

Kolhapur News : कळंबा कारागृहात कैद्यांचा उच्छाद; गोंधळ रोखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सहा जणांचा हल्ला, दगडफेकीत हाताला दुखापत

0
Kolhapur News : कळंबा कारागृहात कैद्यांचा उच्छाद; गोंधळ रोखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सहा जणांचा हल्ला, दगडफेकीत हाताला दुखापत

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात गोंधळ घालणाऱ्या कैद्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावर सहा कैद्यांनी मिळून हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर दगडफेक व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रकाश फुलचंद चव्हाण जखमी झाले असून, त्यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सहा कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur News)

गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला

प्रकाश फुलचंद चव्हाण हे कळंबा कारागृहात कर्तव्यावर असताना काही कैदी विनाकारण गोंधळ आणि दंगा घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कारागृहातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसेच इतर कैद्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन चव्हाण यांनी हस्तक्षेप करत संबंधित कैद्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. (Kolhapur News)

https://www.prahaar.in/2026/09/16/goal-to-take-maharashtras-economy-to-1-trillion-driven-by-innovation-chief-minister-devendra-fadnavis/

केबिनमध्ये घुसून हल्ला

चव्हाण यांनी केलेल्या हस्तक्षेपाचा राग मनात धरून सहा कैद्यांनी त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. यावेळी आरोपींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर दगडफेक करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. (Kolhapur News)

हाताला दगड लागल्याने अधिकारी जखमी

हल्ल्यादरम्यान दगड लागल्याने चव्हाण यांच्या हाताला दुखापत झाली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कारागृहातील इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून चव्हाण यांना आरोपींच्या तावडीतून बाहेर काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. (Kolhapur News)

https://www.prahaar.in/2026/09/16/central-railway-launches-first-daily-train-service-between-beed-and-pune-inaugural-special-train-to-run-on-september-17/

सहा कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

घटनेनंतर प्रकाश चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्यावर हल्ला करणे, दुखापत करणे आणि धमकी देणे यांसह विविध कलमांन्वये सहा कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कळंबा कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Kolhapur News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here