Home महाराष्ट्र नाशिक Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर १६ सप्टेंबरपासून बंद राहणार ? देवस्थान ट्रस्टने स्पष्टच सांगितलं; भाविकांचा संभ्रम दूर

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर १६ सप्टेंबरपासून बंद राहणार ? देवस्थान ट्रस्टने स्पष्टच सांगितलं; भाविकांचा संभ्रम दूर

0
Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर १६ सप्टेंबरपासून बंद राहणार ? देवस्थान ट्रस्टने स्पष्टच सांगितलं; भाविकांचा संभ्रम दूर

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर १६ सप्टेंबरपासून बंद राहणार, अशी माहिती गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमे आणि समाजमाध्यमांवर प्रसारित होत होती. त्यामुळे भाविक आणि नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत भाविकांकडून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडे फोन कॉल्स आणि संदेशांचाही मोठ्या प्रमाणात भडिमार झाला. मात्र, आता या चर्चांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने स्पष्ट उत्तर दिलं आहे. (Nashik Trimbakeshwar Temple News)

मंदिर बंद करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत

देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केलं आहे की, १६ सप्टेंबरपासून मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करण्यासंदर्भात कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन किंवा भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्याकडून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळालेल्या नसल्याचं ट्रस्टने सांगितलं आहे.(Nashik Trimbakeshwar Temple News)

https://www.prahaar.in/2026/09/16/pune-fire-news-the-family-went-out-to-say-goodbye-to-bappa-and-a-massive-fire-broke-out-in-the-house/

‘अफवांवर विश्वास ठेवू नका’

मंदिर बंद राहणार असल्याच्या चर्चांमुळे भाविकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी ट्रस्टने महत्त्वाचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर १६ सप्टेंबर २०२६ रोजी तसेच त्यानंतरही नेहमीप्रमाणे भाविकांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली आहे. (Nashik Trimbakeshwar Temple News)

दरम्यान, यापूर्वीही मंदिर बंद ठेवण्याची शक्यता दोन वेळा वर्तवण्यात आली होती. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराला चार दरवाजे असल्याने भाविकांच्या दर्शनाबाबत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी देवस्थान ट्रस्टने आवश्यक दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या घडीला मंदिर बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना नसल्याने भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेने आणि भक्तिभावाने श्री त्र्यंबकराजाचे दर्शन घ्यावे, असं आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here