Home गणेशोत्सव Ajit Pawar : ‘दादा तुमची वेळ चुकली…’; भोसरीत गणपतीसमोर साकारला अजित पवारांच्या आठवणींचा भावूक देखावा

Ajit Pawar : ‘दादा तुमची वेळ चुकली…’; भोसरीत गणपतीसमोर साकारला अजित पवारांच्या आठवणींचा भावूक देखावा

0
Ajit Pawar : ‘दादा तुमची वेळ चुकली…’; भोसरीत गणपतीसमोर साकारला अजित पवारांच्या आठवणींचा भावूक देखावा
ajit pawar

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आजही शोकसागरात बुडालेला आहे. आपल्या रोखठोक स्वभावाने, वेळेच्या पक्क्या नियोजनाने आणि धडाकेबाज कार्यपद्धतीने जनमानसावर आणि कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या एका नेतृत्वाचे अचानक निघून जाणे प्रत्येकाच्याच पचनी पडणे कठीण जात आहे. गणेशोत्सवाच्या या पावन काळात पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari-Chinchwad) एका भाविकाने आपल्या लाडक्या नेत्याला अनोख्या आणि अश्रूभऱ्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

भोसरी येथील तरुण कार्यकर्ते दर्शन सोनवणे (Darshan Sonawane) यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात अजित पवार यांच्या राजकीय व सार्वजनिक आयुष्यावर आधारित एक अत्यंत भावूक देखावा साकारला आहे. ‘दादा तुमची वेळ चुकली, राजकारण लय वंगाळ’ आणि ‘कामाचा माणूस’ या संकल्पनेवर आधारित हा देखावा सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. आयुष्यभर वेळेचे तंतोतंत पालन करणाऱ्या दादांची एक्झिट मात्र किती अकाली आणि वेळ चुकवणारी ठरली, हीच खंत या देखाव्यातून व्यक्त करण्यात आली आहे.

नेहमी पहाटेपासून कामाला लागणारा ‘कामाचा माणूस’, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर क्षणात निर्णय घेणारा नेता आणि त्यांचा दिलखुलास स्वभाव या सर्व पैलूंची प्रचिती हा देखावा पाहताना येते. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देणारा हा देखावा पाहण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्ते मोठी गर्दी करत असून, पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here